बुलडाणा :जिल्ह्यामध्ये समृद्धी मार्ग असू दे किंवा शहरातील इतर मार्ग अपघाताचे प्रमाण थांबता थांबत नाही आहे. वाहनांवर अनियंत्रित वेग, गुळगुळीत रस्ते आणि त्यामुळे अनियंत्रित झालेले वाहन एका मोठ्या अपघाताला सामोरे जाते. अपघातामध्ये अनेक जीव जातात. बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीकरांसाठी 30 जानेवारीची सकाळ काळजाचा थरकाप उडवणारी बातमी घेऊन उजाडली आहे.
एकमेकांचे जिवलग मित्र :चिखली येथील माजी नगरसेवक गोपाल देव्हडे यांचे लहान बंधू सुनील देव्हडे यांच्यासह आणखी एकाचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. चिखली साकेगाव रस्त्यावरील वाघापूरजवळ आज 30 जानेवारीच्या पहाटे तीनच्या सुमारास अपघात झाला आहे. सुनील किसनराव देव्हडे वय वर्ष ३३, हर्षद पांडे वय वर्ष 30, अशी अपघातात ठार झाल्याची नावे आहेत. तर यश वाधवानी आणि आकाश चिंचोले दोघे राहणार चिखली आणि पप्पू राजपूत राहणार साकेगाव तालुका चिखली अशी अपघातात गंभीर जखमी झाल्यांची नावे आहेत. अपघातातील मृत व्यक्ती आणि जखमी हे एकमेकांचे जिवलग मित्र होते. साकेगावच्या पप्पू राजपूतला घरी सोडण्यासाठी स्विफ्ट डिझायर गाडीने पाचही जण जात होते. वाघापूर जवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली असलेल्या पळसाच्या झाडावर आदळली.