बुलडाणा -मलकापूर शहरात आज पहाटे शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील सार्वजनिक शौचालयासमोरील व रमाई नगर परिसातील सार्वजनिक शौचालयासमोरच्या नालीत 2 हरणाचे मृतदेह आढळून आले. या मुळे शहरात एकच खळबळ उडाली.
मलकापुरात वेगवेगळ्या ठिकाणी आढळले 2 हरिणींचे मृतदेह, शहरात खळबळ - सिंधी कॉलनी
या घटनेची माहिती वन विभागाचे अधिकारी रवि कोंडावार, साहेबराव कुसोड व कर्मचारी सपकाळ यांच्यासह इतर वनविभागाची टिम घटनास्थळी दाखल झाली. ही बातमी पसरताच बघ्यांनी येथे मोठी गर्दी केली होती.
या घटनेची बातमी पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाचे अधिकारी रवि कोंडावार, साहेबराव कुसोड व कर्मचारी सपकाळ यांच्यासह इतर वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी पंचनामा करून पुढील कारवाई करत हरणींचे मृतदेह ताब्यात घेतले. सिंधी कॉलनी परिसात काही दिवसांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासल्यास या हरणांचा मृत्यू कशाने झाला, हे स्पष्ट होऊ शकेल.