बुलडाणा -मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील १४ वर्षांच्या एका विद्यार्थ्याने घरात कुणीही नसताना ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत.
बुलडाण्यात 14 वर्षांच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट - विद्यार्थी आत्महत्या
धरणगाव येथील शाळकरी मुलगा प्रणव निवृत्ती इंगळे याने आई-वडील शेतात गेले असताना दुपारच्या सुमारास घरातील छतास ओढणी आणि नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला.

धरणगाव येथील शाळकरी मुलगा प्रणव निवृत्ती इंगळे याने आई-वडील शेतात गेले असताना दुपारच्या सुमारास घरातील छतास ओढणी आणि नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला. प्रणव शाळेत गेला की नाही, हे बघायला गेले असता शेजारच्यांच्या ही बाब लक्षात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्यांनी घटनेचा पंचनामा करत प्रणवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
प्रणवने आत्महत्या का केली, याचे कारण अद्यापही स्पष्ट होवू शकले नाही. या घटनेने इंगळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.