बुलडाणा -जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे नाली खोदकाम करत असताना १३२ साप निघाल्याचा प्रकार समोर आला. ग्रामीण भागात एक-दोन साप दिसले तर फारसे गांभिर्याने घेतले जात नाही. मात्र, एकावेळी १३२ साप निघाल्याने ही घटना आश्चर्यकारकच मानली जात आहे. सर्पमित्र उपलब्ध नसल्याचे सांगत भीतीपोटी या सापांना गावकऱ्यांनी मारून टाकले.
पिंपळगाव काळे गावात ३० एप्रिलला सायंकाळी नालीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू होते. त्या ठिकाणी चार ते पाच साप असल्याचे काही तरुणांच्या निदर्शनास आले. या तरुणांनी त्या सापांना मारून टाकले. मात्र, थोड्या वेळातच काही व्यक्तींना आणखी साप आढळून आले. त्यानंतर एकापाठोपाठ ३० ते ४० साप आढळून आले. त्यानंतर पुन्हा १ मे ला पुन्हा १३२ साप आढळून आले. या सापांमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती गावातील रहिवासी राजेश काळे यांनी दिली आहे. ग्रामपंचायत किंवा वन विभागाच्यावतीने यावर उपयोजना केल्या जाव्यात, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे.
कोब्रा, पानदिवड आणि कवड्या या तीन जातीचे आहेत साप -