बुलडाणा- विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर ठिकाण हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. आधी 40 आणि आज 11 कोरोनाबधितांची नोंद करण्यात झाली आहे. तर लोणार तालुक्यातील ब्राम्हणचिकना येथील एक कोरोनाबाधित, असे आज एकूण 12 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये भीमनगर, मलकापूर येथील 16 व 20 वर्षीय तरुणी, 9 वर्षीय मुलगा, 30 वर्षीय पुरूष रुग्ण आहेत. तसेच पारपेठ, मलकापूर येथील 43 वर्षीय पुरुष, 59 वर्षीय पुरुष, हेडगेवार नगर, मलकापूर येथील 36 वर्षीय पुरुष, धोंगर्डी ता. मलकापूर येथील 70 वर्षीय वृद्ध महिला, 62 वर्षीय वृद्ध पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे हनुमान चौक, मलकापूर येथील 8 महिन्याचे बाळ व 27 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळली आहे. लोणार तालुक्यातील ब्राम्हणचिकना येथील 30 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशाप्रकारे 132 कोरोना अहवालांपैकी 120 अहवाल निगेटिव्ह असून 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.