महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 1, 2019, 2:25 AM IST

ETV Bharat / state

बुलडाणा लोकसभेसाठी 5 राजकीय पक्षांसह 7 अपक्ष उमेदवार रिंगणात

या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांच्या सभा पुढील आठवड्यापासून सुरू जिल्ह्यातून सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

buldhana elecation candidates

बुलडाणा -लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. बुलडाणा लोकसभा मतदार संघात राजकीय पक्षांच्या अधिकृत ५ उमेदवांसह ७ अपक्ष असे एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत.


बुलडाणा लोकसभा मतदार संघा साठी १५ उमेदवारांनी २३ नामांकन अर्ज दाखल दाखल केले होते. त्यापैकी २ अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाले. तर दादाराव गायकवाड यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने एकूण १२ उमेदवार निवडणुकीत आपले भविष्य आजमावणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ज्यामध्ये अब्दुल हफीज अब्दुल अजीज (बहुजन समाज पार्टी), प्रतापराव गणपतराव जाधव (शिवसेना), डॉ राजेंद्र भास्करराव शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रताप पंढरीनाथ पाटील (बहुजन मुक्ती पार्टी), बळीराम भगवान सिरस्कार (वंचित बहुजन आघाडी), अनंता दत्ता पुरी (अपक्ष), गजानन उत्तम शांताबाई (अपक्ष), दिनकर तुकाराम संबारे (अपक्ष), प्रविण श्रीराम मोरे (अपक्ष), वामनराव गणपतराव आखरे (अपक्ष), भाई विकास प्रकाश नांदवे (अपक्ष) आणि विजय बनवारीलाल मसानी (अपक्ष) यांचा समावेश आहे..

buldhana elcation

तर या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांच्या सभा पुढील आठवड्यापासून सुरू जिल्ह्यातून सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर , खा. असदोद्दीन ओवेसी , यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या देखीलसभा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे..

ABOUT THE AUTHOR

...view details