बुलडाणा - कोरोना लसीकरण म्हणावे तसे वेगात होत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे आरोग्य विभाग पूर्ण ताकदिनीशी प्रयत्न करीत असला तरी दुसरीकडे समाजमन शंका कुशंकांनी भरले आहे. अशावेळी 103 वर्षीय आजोबांनी कोरोना लस घेऊन इतरांसमोर आदर्श उभा केला आहे. 'मी लस घेतली, तुम्ही पण घ्या' असे आवाहन देखील या आजोबांनी नागरिकांना केले. लस घेणाऱ्या या आजोबांचे नाव तुकाराम पाटील असे आहे.
बुलडाण्यात 103 वर्षीय आजोबांनी निसंकोचपणे घेतली कोरोना लस
बुलडाणा येथे एका 103 वर्षीय आजोबांनी कोरोना लस घेतली आहे. तसेच लसीमुळे शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे मी लस घेतली, तुम्हीही घ्या, असे त्यांनी म्हटले आहे. तुकाराम पाटील असे या आजोबांचे नाव आहे.
20 एप्रिलला मेहेत्रे हॉस्पिटलमध्ये घेतली लस -
बुलडाणा येथे डॉ. राहुल मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारीं 20 एप्रिल रोजी 103 वर्षीय तुकाराम राजाराम पाटील (रा.भोगावती) यांनी मेहेत्रे हॉस्पिटलमध्ये कोविशिल्ड लस घेतली. यावेळी तुकाराम पाटील यांनी जिल्ह्यातील तरुणांना व वयोवृध्दांना 'मी लस घेतली, आपणही घ्या' असा संदेश दिला. 'लसीचा कुठलाच त्रास मला झाला नाही व त्याचा अनिष्ठ परिणाम शरिरावर होत नाही', असे डॉ. राहुल मेहेत्रे यांना व उपस्थितांना त्यांनी सांगितले.