महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊन काळात रोखले 10 बालविवाह, चोरुन लग्न लावणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल - बालविवाह रोखण्यास यश

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाच्या लॉकडाऊन काळात 10 बालविवाहाच्या तक्रारी जिल्हा बाल संरक्षण समिती, बाल न्यायालय यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याची खात्री करून वेळेत कारवाई करून नियोजित बालविवाह रोखण्यात आले होते. मात्र त्यानंतरही काही बालविवाह पालकांकडून चोरून लावण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

Child marriage
लॉकडाऊन काळात रोखले 10 बालविवाह

By

Published : Sep 19, 2020, 10:01 AM IST

Updated : Sep 19, 2020, 10:24 AM IST

बुलडाणा- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तसेच या काळात धार्मिक, सामाजिक कार्यक्रमासह विवाह सोहळ्यासही बंदी घालण्यात आली होती. मात्र, याच लॉकडाऊनच्या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये बालविवाहाचे प्रयत्न झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच या विरोधात प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार जिल्ह्यातील 10 बालविवाह रोखण्यात आले आहेत. मात्र त्यातील काही बालविवाह पालकांकडून चोरून लावण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या बालविवाह प्रकरणी लवकरच संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

लॉकडाऊन काळात रोखले 10 बालविवाह

समाजात महिला व मुलींचे वाढते आजार कुपोषण याचे प्रमुख कारण म्हणजे बालविवाह, आणि कमी वयात मुलींवर आलेली मातृत्वाची जबाबदारी, हे टाळण्यासाठी शासनाने मुला-मुलींच्या लग्नाचे वय निश्चित केले आहे. तसेच बालविवाहाला प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक गावात ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे. असे असतानाही देखील पालकांकडून बाल विवाह केले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. जिल्ह्यात देखील चोरून बालविवाह लावल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाच्या लॉकडाऊन काळात 10 बालविवाहाच्या तक्रारी जिल्हा बाल संरक्षण समिती, बाल न्यायालय यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याची खात्री करून वेळेत कारवाई करून नियोजित बालविवाह रोखण्यात आले होते. मात्र त्यानंतरही काही बालविवाह पालकांकडून चोरून लावण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांवर आता लवकरच कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. बालविवाह रोखण्यासाठी समाजातील अशा विचारांच्या लोकांवर कडक कारवाई होणे गरजेच आहे. तरच याला आळा बसणार असल्याचे मत समाजसेवकांकडून व्यक्त केले जात आहे.

Last Updated : Sep 19, 2020, 10:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details