महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक... तब्बल 38 दिवसांनंतर जिल्ह्यात एकाही कोरोना बाधिताचा मृत्यू नाही - corona casualty in bhandara

भंडाऱ्यात सप्टेंबर महिन्यापासून कोरोना मृत्यूंचे प्रमाण वाढले होते. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्यतेही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. ऑक्टोबर महिन्यात कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत घट होणे सुरू झाले. मात्र मृतांची संख्या कमी होत नसल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली. अखेर आजचा दिवस महत्त्वाचा ठरला.

corona casualty in bhandara
दिलासादायक...तब्बल 38 दिवसांनंतर जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू नाही

By

Published : Oct 18, 2020, 10:25 PM IST

भंडारा - तब्बल 38 दिवसांनंतर जिल्ह्यामध्ये एकही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. 8 सप्टेंबर रोजी मृत्यूसंख्या शून्य होती. त्यानंतर आज (18 ऑक्टोबर) एकही मृत्यू न झाल्याने जिल्ह्यासाठी सुखद बाब ठरली आहे. रुग्ण बरे होण्याच्या दरात रोज वाढ होत असून आज दर 83.04 टक्क्यांवर पोहोचला.

भंडाऱ्यात सप्टेंबर महिन्यापासून कोरोना मृत्यूंचे प्रमाण वाढले होते. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्यतेही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. ऑक्टोबर महिन्यात कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत घट होणे सुरू झाले. मात्र मृतांची संख्या कमी होत नसल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली. अखेर आजचा दिवस महत्त्वाचा ठरला. आज 122 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 6 हजार 202 झाली असून आज 93 नवे कोरोनाबाधित आढळले. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7 हजार 468 झाली आहे.

आज 813 व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासण्यात आले. तर 93 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. आतापर्यंत 59 हजार 960 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 7 हजार 468 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या.

आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 34, मोहाडी 07, तुमसर 13, पवनी 10, लाखनी 07, साकोली 15 व लाखांदूर तालुक्यातील 07 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत 6 हजार 202 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. सघ्या 1079 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर जिल्ह्याचा मृत्यूदर 02.50 टक्के आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details