भंडारा- नागपूर येथील नाग नदीचे दूषित पाणी भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीत येत असल्याने, वैनगंगेचा पाणी प्रदूषित झाले आहे. या पाण्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात पोटाचे आणि शरीरिक आजार होत आहे. वेळोवेळी या विषयी तक्रार केली गेली. मात्र, शासन गंभीर नसल्याने त्यांचे या विषयाकडे लक्ष वेधण्याकरीत पवनी येथील वैनगंगा नदीपात्रात युवाशक्ती संघटनेतील कार्यकरत्यांनी स्वतःला गाडून अर्ध दफन आंदोलन केले आहे. यावेळी संघटनेचे कार्येकर्ते तसेच महिलांनी मोठ्या संख्येत या आंदोलनात भाग घेतले.
नाग नदीच्या दूषित पाण्यावरून युवाशक्ती संघटनेचे वाळूमध्ये अर्धदफन आंदोलन - अर्ध दफन आंदोलन
नागपूर येथील नाग नदीचे दूषित पाणी भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीत येत असल्याने, वैनगंगेचा पाणी प्रदूषित झाले आहे. या पाण्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात पोटाचे आणि शरीरिक आजार होत आहे. वेळोवेळी या विषयी तक्रार केली गेली. मात्र, शासन गंभीर नसल्याने त्यांचे या विषयाकडे लक्ष वेधण्याकरीत पवनी येथील वैनगंगा नदीपात्रात युवाशक्ती संघटनेतील कार्यकरत्यांनी स्वतःला गाडून अर्ध दफन आंदोलन केले आहे.
नागपूर च्या नाग नदीचे पाणी हे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीत येऊन मिसळते. गो.से धरण होण्यापूर्वी हे पाणी नदीतून वाहत पुढे जात असे. मात्र धरण बनल्यामुळे पाणी साचलेले आहे. त्यामुळे नदी पूर्णपणे दूषित झाली आहे. नाग नदीचे पाणी वैनगंगा नदीत शुद्ध केल्या शिवाय सोडू नये यासाठी बरेच पत्रव्यवहार झालीत. आंदोलनेही झालीत. मात्र, यावर अजूनही पूर्ण तोडगा निघाला नाही. नाग नदीच्या पाण्यापैकी काही टक्के पाणी शुद्ध करून सोडला जातो, मात्र उर्वरित पाणी तसाच सोडला जातो. बीजेपी चे शासन आल्यावर यावर लवकरच उपाय योजना केल्या जाईल असे सांगितल्या गेले. मात्र, अजूनपर्यंत तसे काही झाले नाही.
भंडारा जिल्ह्याचा विचार केला असता वैनगंगा नदी हि जिल्ह्यासाठी जीवनदायिनी आहे. याच नदीतून भंडारा, पवनी शहराला पाणी पुरवठा केला जातो. तसेच नदी काठावर याच नदीतून पाणी पुरवठा होतो. मात्र, नाग नदीच्या पाण्यामुळे या वैनगंगेच्या पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. नदिचे पाणी हिरवे झाले आहे. ते प्रदूषित झाले असून पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल नीरी ने दिला आहे. या पाण्यामुळे लोकांना विविध आजार होत आहे. मोठ्या प्रमाणत मासे मरत आहेत. तरीही राजकीय मंडळी या बाबत अजिबात गंभीर दिसत नाही. या राजकीय मंडळींचे व प्रशासनाचे या गंभीर मुद्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ४३ डिग्री तापमानात, नदीच्या पात्रात या आंदोलन कर्त्यांनी स्वतःला गाडून घेत आंदोलन केले आहे. आणि या बाबतीत शासनाने काही उपाययोजना करावे या साठी आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे.