महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गावातील विद्यार्थ्यांसाठी धावून आले तरुण, देतायेत मोफत शिक्षणाचे धडे - भंडारा न्यूज

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेताना बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत. त्या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील सोरणा गावातील शिक्षित तरुण पुढे आले आहेत. त्यांनी एक उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे मिळत आहेत.

youth  provied Free education lessons to small students in bhandra
गावातील विद्यार्थ्यांसाठी धावून आले तरुण, देतायेत मोफत शिक्षणाचे धडे

By

Published : Jul 26, 2020, 5:34 PM IST

Updated : Jul 29, 2020, 5:06 PM IST

भंडारा - सध्या देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावर उपाय शोधत शाळांनी ऑनलाईन शिक्षण हा पर्याय निवडला आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे शहरी भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण घरी बसल्या सुरू झाले. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेताना बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत. त्या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील सोरणा गावातील शिक्षित तरुण पुढे आले आहेत. त्यांनी एक उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे मिळत आहेत.

गावातील विद्यार्थ्यांसाठी धावून आले तरुण...
भंडारा जिल्ह्याच्या टोकावर जेमतेम 500 लोकसंख्या असलेला गाव म्हणजे सोरणा. गट ग्रामपंचायत असलेल्या या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथी वर्गापर्यंत 32 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, कोरोनाच्या उद्रेकानंतर विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले होते. शिक्षण विभागाने गावातील शिक्षण समितीच्या आणि पालकांच्या माध्यमातून शाळा सुरू करावी की नाही याचा निर्णय हा मुख्याध्यापकांवर सोडला होता. विद्यार्थ्यांचा सुरक्षेच्या दृष्टीने विचार करून सध्यातरी या गावातील शाळा बंद आहे.शाळा बंद म्हणून मुलं शिक्षणांपासून दूर जाऊन केवळ दिवसभर गावात खेळत होती. गावातील विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात आहेत असे कोरोनामुळे गावात परत आलेल्या काही शिक्षित तरुणांच्या लक्षात आले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या गावातील शिक्षित तरुणांनी या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा मानस गावकाऱ्यांपुढे ठेवला. गावकऱ्यांनी आणि शिक्षकांनीही त्याला मंजुरी दिली. शिक्षकांनी एक व्हाट्सअप ग्रुप तयार करून गावातील तरुण मंडळींना आणि पाल्यांना या ग्रुपमध्ये जोडले. त्या माध्यमातून दररोज विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ या व्हाट्सअप ग्रुपवर पाठवला जातो. शिक्षकांनी पाठवलेला अभ्यास विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी यातील तीन तरुणांनी 5-5 विद्यार्थ्यांचे गट तयार केले. सकाळी साडेसात ते साडेआठ आणि सायंकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम गावातील हे तीन तरुण करत आहेत. तर ज्या पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाही, अशा पालकांच्या घरी जाऊन त्या दिवशीच्या अभ्यासाविषयी माहिती देण्याचे काम इतर तरुण करत आहेत. धर्मापाल धुर्वे, कोमल राठोड, प्रीती राठोड, विपीन उचिबघेले, राकेश वाघाडे, देवानंद शहारे अशी या तरुणांची नावे आहेत. दोन वर्षापूर्वी गावातील 27 विद्यार्थी हे खासगी इंग्रजी शाळेत शिकायला जात होते. मात्र, मुख्याध्यापक म्हणून चेतनानंद मेश्राम आणि सहाय्यक शिक्षक कैलाश चव्हाण रुजू झाले. त्यांनी शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवला. त्यामुळे गावातील सर्व विद्यार्थी आता गावात शिक्षण घेत आहेत. शिक्षक कैलास चव्हाण यांनी स्वतः मोबाईलवर अॅप तयार करून त्या माध्यमातून दररोज शिक्षणाचे धडे मोबाईलवर पालकांपर्यंत पाठवतात. तर गावातील काही तरुण प्रत्यक्ष शिक्षण देतात तर ज्या पालकांकडे अँड्रॉइड नाही त्यांना मोबाईलवर आलेले शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत. या तरुणांच्या जिद्दीमुळेच गावातील मुलांचे शिक्षण अविरत सुरू आहे.
Last Updated : Jul 29, 2020, 5:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details