महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडाऱ्यात पुन्हा एका तरुणाचा गळा चिरुन खून; दहा दिवसातील दुसऱ्या हत्याकांडाने परिसरात दहशत - तरुणाच्या हत्याकांडाने भंडाऱ्यात खळबळ

शुक्रवारी वार्डमध्ये दुपारी तीनच्या दरम्यान एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. त्या तरुणाच्या मानेवर आणि पोटावर वार करुन त्याचा खून करण्यात आला आहे. खून एवढ्या निर्घूणपणे करण्यात आल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

youth
सूरज यादव

By

Published : Jun 29, 2020, 7:45 PM IST

Updated : Jun 29, 2020, 9:43 PM IST

भंडारा- शहरात एका तरुणाचा निर्घूणपणे गळा चिरुन खून केल्याने खळबळ उडाली. सूरज यादव असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. भरदिवसा गजबजलेल्या शुक्रवारी वार्डमध्ये हा खून झाल्याने दहशत पसरली आहे. मागील दहा दिवसांमध्ये शहरात दुसऱ्यांदा हत्याकांड घडले आहे. हत्येनंतर मारेकरी फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.

भंडारा शहरातील शुक्रवारी वार्डमध्ये दुपारी तीनच्या दरम्यान एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. त्या तरुणाच्या मानेवर आणि पोटावर वार करुन त्याचा खून करण्यात आला आहे. खून एवढ्या निर्घूणपणे करण्यात आल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

सूरज जाधव हा मूळचा नागपूरचा असून शुक्रवारी वार्डात भाड्याने खोली करुन राहत होता. त्याचा खून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे घटनास्थळावरून लक्षात येत होते. घटनास्थळावर फुटलेला मोबाईल आणि शस्त्राची कव्हर पडलेली होती. घटना जिथे झाली त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात रहिवाशी राहतात. मात्र हत्याकांडानंतर पोलिसांनी नागरिकांना या विषयी विचारले असता कोणीही काहीही सांगण्यास तयार नव्हते. हा खून एका व्यक्तीने केला, की एकापेक्षा जास्त लोक होते, हत्याकांड पूर्ववैमनस्यातून झाले की त्यामागे अजून कुठले कारणे आहेत, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

भंडाऱ्यात पुन्हा एका तरुणाचा गळा चिरुन खून; दहा दिवसातील दुसऱ्या हत्याकांडाने परिसरात दहशत

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका हा खुनाच्या मालिकांसाठी कुप्रसिद्ध आहे. तिथे नेहमीच हत्याकांड होतात. मात्र मागील दहा दिवसात भंडारा शहरातही हे दुसरे हत्याकांड झाले आहे. या अगोदर अगदी शुल्लक भांडणावरून लोखंडी रॉडने एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे भंडारा शहरही हत्याकांडाचे शहर बनते की काय अशी भीती सध्या नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

Last Updated : Jun 29, 2020, 9:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details