महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यात सर्वत्र योगा दिवस साजरा; आबालवृद्धांचा मोठा प्रतिसाद - योगासन

जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये योगसन करत योगा दिवस साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योगा दिवस

By

Published : Jun 21, 2019, 10:32 AM IST

भंडारा- देशभरात आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस असल्याने संपूर्ण देशात सकाळी योगासन करून योगा दिवस साजरा करण्यात आला. जिल्ह्यातही योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच योगासने केली.

जिल्ह्यात सर्वत्र योगा दिवस साजरा; आबालवृद्धांचा मोठा प्रतिसाद

जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून भंडारा योगाभ्यासी मंडळातर्फे शहरातील बहिरंगेश्वर देवस्थान परिसरात 200 लोकांनी सामूहिक योगा करत योग दिवस साजरा केला. यात तरुणांसोबतच आबालवृद्ध लोकही यात सहभागी झाले होते. मागील 15 वर्षापासून अविरत योग याठिकाणी केले जातात. येथे सकाळी 5 वाजताच सर्वच वयोगटातील लोक योगा करण्यासाठी एकत्र येतात. धकाधकीच्या युगात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या व्याधीने त्रस्त असतात. रुग्णालयात जाऊनही आराम मिळत नसल्याने त्यावर रामबाण उपाय म्हणजे योगा असल्याने त्याचे महत्व यावेळी आयोजकाद्वारे पटवून देण्यात आले. तसेच योगा करण्याची सवय लोकांना व्हावी यासाठी रोज योगा करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details