महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुढच्या पाच दिवसात जिल्हायात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता.. - पावसाचा अंदाज

पुढच्या पाच दिवसात पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज पुन्हा एकदा हवामान खात्याने वर्तविला आहे. मागील महिन्याच्या कालावधीमध्ये भंडारा जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.

will-be-heavy-rain-in-next-five-days
पुढच्या पाच दिवसात पुन्हा अककाळी पावसाची शक्यता..

By

Published : Mar 14, 2020, 9:48 PM IST

भंडारा- मागील चार महिन्यांपासून अधून-मधून येत असलेला अवकाळी पाऊस पुढच्या पाच दिवसात पुन्हा कधीही येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टामुळे या मान्सून पूर्व ढगाची परिस्थिती न बदलल्याने अवकाळी पाऊस येत असल्याचे तज्ञांनी सांगितले.

पुढच्या पाच दिवसात पुन्हा अककाळी पावसाची शक्यता..
हेही वाचा-कोरोनाचा धसका : चीनबाहेरील सर्व अ‌ॅपल स्टोअर २७ मार्चपर्यंत करणार बंद

पुढच्या पाच दिवसात पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज पुन्हा एकदा हवामान खात्याने वर्तविला आहे. मागील महिन्याच्या कालावधीमध्ये भंडारा जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. गारपिटीमुळे आणि या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीपातील पिकांचे नुकसान झाले. तसेच भाजीपाला, हरभरा, चना, गहू यांचे सतत नुकसान होत आलेले आहे. त्यामुळे आता पुन्हा हवामान खात्याने इशारा दिल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात गहू उभा आहे. किंवा भाजीपाला लागवड केलेली आहे, ते शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत.

मार्च महिन्यातील उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तापमानात हळूहळू वाढ होत चाललेली आहे. मात्र, मध्येच बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे एक-दोन दिवसांसाठी पुन्हा तापमानात घट होऊन थंडावा निर्माण होतो. कधी ऊन तर कधी पाऊस अशा या विचित्र वातावरणामुळे विविध आजार होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी, नागरिकांनीही स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details