भंडारा - पतीच्या मृत्यूचे दुःख अनावर झाल्याने पत्नीचा देखील मृत्यू झाला आहे. यामुळे त्यांची दोन चिमुकली आई-वडिलांशिवाय पोरकी झाली आहेत. साकोली तालुक्याच्या वडद या गावात ही घटना घडली आहे. या दोन चिमुकल्यांकरिता एका व्हाॅट्सअप ग्रुपने 25 हजारांची आर्थिक मदत देऊन माणुसकीचा परिचय दिला आहे.
भंडाऱ्यात मुलांसाठी व्हाॅट्सअप ग्रुपने केली 25 हजार रुपयांची मदत हेही वाचा-'या' खनिजाचा राजस्थानात आढळला प्रचंड साठा; आयातीऐवजी भारत भविष्यात करणार निर्यात
घनश्याम कापगते यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीला दुःख अनावर झाले. त्यानंतर अवघ्या काही तासातच पत्नीचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना एक पाच वर्षाचा मुलगा व अडीच वर्षाची मुलगी आहे. त्यांचा संभाळ आजीने करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या आजीचे वय झालेले आहे. त्यामुळे ती काम करून या मुलांचा सांभाळ करू शकत नाही.
त्यामुळे सामाजिक भान जपत सानगडी येथील तरुण वर्ग समोर आला आहे. त्यांनी या दोन चिमुकल्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सहानगड ग्रुपच्या माध्यमातून या मुलांसाठी 25 हजारांची रक्कम त्यांना जमा केली आहे.