भंडारा - लॉकडाऊनमुळे अनेकांची लग्न रखडली आहेत. तर अनेकजण मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकत आहे. असेच एक लग्न पोलीस चौकीवर पार पडले. जिल्हा बंदी असताना इ-पास न मिळाल्याने कुटुंबीयांनी चौकीतच लग्न लावण्याचा निर्णय घेतला. भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील सावंगी पोलीस चौकीवर मोजक्या लोकांच्या उपस्थित सोशल डिस्टंसिंगचे पालन करत हा विवाह पार पडला.
विवाहस्थळ 'पोलीस स्टेशन'... भंडारा-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर पार पडले लग्न - लॉकडाऊन लग्न भंडारा
लग्नाची वेळ होऊनही परवानगी न मिळाल्याने दोन्ही कुटुंबीयांनी दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पोलीस चौकीवर लग्न करण्याचा निर्णय घेतला.
भंडारा जिल्ह्याच्या रुयाळ गावातील नितीन हरडे या मुलाचे लग्न गडचिरोली जिल्ह्यातीलच्या वसा गावातील मयुरी डोर्लीकर या तरुणीशी जमले होते. मात्र, कोरोनामुळे लग्न होण्यास अडचणी येत होत्या. या दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली. मात्र, लग्नाचा वेळ होऊनही परवानगी न मिळाल्याने दोन्ही कुटुंबीयांनी दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पोलीस चौकीवर लग्न करण्याचा निर्णय घेतला. या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा भंडाऱ्यासह गडचिरोली जिल्ह्यातही होत आहे.