महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईव्हीएम सुरू ठेवण्यासाठी काँग्रेस-भाजपची पडद्यामागे युती; वामन मेश्रामांचा घणाघात - bhandara political news

ईव्हीएम हे काँग्रेसचे पिल्लू असून, भाजप ईव्हीएम च्या आधारे सत्तेचा उपभोग घेत असल्याचा आरोप बहुजन क्रांती मोर्चाचे वामन मेश्राम यांनी केला आहे.

वामन मेश्राम, बहुजन क्रांती मोर्चा

By

Published : Sep 26, 2019, 10:08 AM IST

भंडारा - ईव्हीएम हे काँग्रेसचे पिल्लू असून, भाजप ईव्हीएमच्या आधारे सत्तेचा उपभोग घेत असल्याचा आरोप बहुजन क्रांती मोर्चाचे वामन मेश्राम यांनी केला आहे.

भाजप ईव्हीएम च्या आधारे सत्तेचा उपभोग घेत असल्याचा आरोप बहुजन क्रांती मोर्चाचे वामन मेश्राम यांनी केला

काँग्रेस सरकारच्या काळात सर्वप्रथम भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी यांनी ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित करून या मशिन्सचा दुरुपयोग होण्यासंदर्भात कोर्टाला सांगितले होते. कोर्टाने ते मान्यही केले होते; मात्र यानंतर काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी करून ईव्हीएम सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात भाजपला सत्ता मिळवून दिली, अशी टीका त्यांनी केली आहे.

मेश्राम यांनी ईव्हीएम बद्दल भूमिका स्पष्ट करताना, मशिन्स विरुद्ध चार गोष्टी प्रमुख्याने समोर आल्यामुळे आम्ही ते निवडणुकीत वापरणे अयोग्य असल्याचे कोर्टात सांगितले होते. ईव्हीएमद्वारे केलेले मतदान मतदाराला कळत नाही. यामुळे त्याची विश्वासार्हता कमी होते, असे वामन मेश्राम म्हणाले.

हेही वाचा बॅलेट पेपर इतिहास जमा, विधानसभेची निवडणूक ईव्हीएमवरच होणार - मुख्य निवडणूक आयुक्त

बहुजन क्रांती मोर्चा तर्फे आयोजित ईव्हीएम मंडळ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, ईव्हीएम मशिन्सची आकडेवारी पुन्हा पुन्हा मोजता येत नसून, एकदा मतदान केल्यानंतर ते कोणाला जाते हे मतदार नाही, तर दुसरा ठरवतो, असे त्यांनी सांगितले. तसेच ईव्हीएमला बॅलेट पेपर सारखा पुरावा नसून, मतदानानंतरच्या आकडेवारीतही बदल करता येऊ शकतो, असे ते म्हणाले. यामुळे ईव्हीएम हे धोकादायक असल्याचे मत मेश्राम यांनी व्यक्त केले.

हेही वाचा ईव्हीएम हटवा : विधानसभा निवडणुका बॅलेटवर घ्या, आझाद मैदानात आंदोलन

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना समजलेल्या मुद्द्यांवर त्यांनी केंद्र सरकार व निर्वाचन आयोगाला मत मांडण्याचे सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.

काँग्रेसचे हे पाप लपवण्यासाठी भाजपने मदत केली असून, या मोबदल्यात काँग्रेसने भाजपला सत्तेत येण्यासाठी ईव्हीएम ची मदत दिल्याची टीका मेश्राम यांनी केली. जोपर्यंत देशातून ईव्हीएम बंद होणार नाही, तोपर्यंत देशात निष्पक्ष निवडणुका होणे अशक्य आहे, असे त्यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details