भंडारा :भंडारा जिल्ह्यातील चार तालुक्याच्या 19 ग्रामपंचायतची थेट सरपंचासह सार्वत्रिक निवडणुकीचा ( Grampanchayat Election 2022 ) मतदानाला रविवारी सकाळी 7.30 वाजेपासून सुरुवात झाली आहे. 19 पैकी 16 ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी 72 तर 122 सदस्य पदासाठी 325 उमेदवार रिंगणात आहेत. दहा सदस्य अविरोध निवडून आलेले आहेत. जिल्ह्यातील 65 मतदान केंद्रांवर 28 हजार 540 मतदार मतदानाचा हक्क बजावणार ( Voters will use their right to vote ) आहेत. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसत असून मोठ्या प्रमाणात नागरिक त्यांचे मतदानाचे हक्क बजावण्यासाठी घरून बाहेर येत आहेत.
Grampanchayat Election 2022 : भंडारा जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतसाठी मतदान, सरपंच पदासाठी 72 रिंगणात
भंडारा जिल्ह्यातील चार तालुक्याच्या 19 ग्रामपंचायतची थेट सरपंचासह सार्वत्रिक निवडणुकीचा (General elections including Sarpanch) मतदानाला आज सकाळी 7.30 वाजेपासून सुरुवात झाली आहे. ( Grampanchayat Election 2022 )
ग्रामपंचायतच्या मतदानाला सुरुवात : भंडारा तालुक्यातील केसलवाडा, भोजापुर, खराडी, परसोडी, राजे दहेगाव, खैरी पा., संगम पू., पिंपरी, पू. तिद्दी, बोरगाव बु., इटगाव, सुरेवाडा, तुमसर तालुक्यातील डोंगरी बु. पवनी तालुक्यातील गोसे बू., आणि साकोली तालुक्यातील सिलेगाव टोला. या ग्रामपंचायतच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी साडेसात वाजेपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 19 ग्रामपंचायतच्या 61 प्रभागात निवडणूक होत असून 65 मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.
28 हजार 554 मतदार बजावतील हक्क :जिल्ह्यातील एकोणवीस ग्रामपंचायतच्या निवडणुकीत 28 हजार पाचशे चौपन मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यात 14360 पुरुष तर 14 हजार 180 महिला मतदारांचा समावेश आहे भंडारा तालुक्यातील 23 हजार 325 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून त्यात पुरुष एकवीस हजार 624 महिला 11601 मतदानाचा समावेश आहे तुमचा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी 3657 मतदार असून १९१० पुरुष तर 1000 887 महिला मतदार आहेत पवनी तालुक्यातील एका ग्रामपंचायत साठी 964 मतदार असून साकोली तालुक्यातील 472 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.मतदान केंद्रांवर निवडणुकीच्या काळात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आज मतदान आटोपल्यानंतर 17 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.