भंडारा -लाखनी तालुक्यात एका विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह शाळेसमोर ठेवून गावकऱ्यांनी गेल्या २४ तासापासून आंदोलन सुरू केले आहे. शाळेच्या मुख्याध्यापकावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी गावकरी करत आहेत. मात्र, शासनामार्फत अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे गावकरी मृतदेह घेऊन शाळेसमोर आंदोलन करीत आहेत.
अपघातानंतर मुलाचा मृतदेह शाळेसमोर ठेवून गावाकऱ्यांचे आंदोलन - मिरगाव
पोलिसांनी मात्र कुणावरही गुन्हा दाखल न केल्याने बुधवारी सकाळपासूनच चेतन याचा मृतदेह शाळेच्या समोर ठेवून परिवारातील लोकांनी आणि संपूर्ण गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. मुख्याध्यापक आणि शाळेच्या संचालकांवर मनुष्यवधाचा आणि बालगुन्हेगारीचा गुन्हा दाखल होणार नाही तसेच परिवारातील लोकांना आर्थिक मदत मिळणार नाही तोपर्यंत चेतनचा मृतदेह हलवणार नसल्याचा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मिरगाव येथील शुक्राचार्य विद्यालयातील विद्यार्थी चेतन विनायक जवंजाळ हा नववीत शिकणारा विद्यार्थी मंगळवारी ट्रॅक्टर खाली चिरडून मृत्यू पावला. मंगळवारला शिवजयंतीचा कार्यक्रम असल्यामुळे चेतन शाळेत गेला होता. १२ वी व १० वी परीक्षा केंद्र मुंडीपार येथे असल्याने शाळेच्या शिक्षकांनी ट्रॅक्टरद्वारे डेक्स बेंच पाठविण्याचे ठरविले. सदर साहित्य पोहोचवून उतरविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. येथील शाळेत साहित्य उतरवून ट्रॅक्टरद्वारे परत येत असताना किटाळी येते अचानक चेतन हा ट्रॅक्टर चालकाजवळील जागेवरून खाली कोसळला. त्यामध्ये ट्रॅक्टरच्या चाकात सापडल्याने त्याचा जागीच करुण अंत झाला. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. पोलिसांच्या मध्यस्थीने गावकऱ्यांनी आणि परिवारातील लोकांनी त्याचा पोस्टमार्टम करू दिला. मात्र, शाळेच्या संचालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी परिवाराने आणि गावकऱ्यांनी केली.