भंडारा - भंडारा रोड रेल्वे स्टेशनवरुन एक किमी अंतरावर गेलेल्या विदर्भ एक्सप्रेसला एकलारी या गावाजवळ झटका बसला. त्यानंतर दोन कोचमधील कल्पिंग तुटून पडले. ही बाब रेल्वे इंजिन चालकाला लक्षात येताच त्याने समयसुचकता दाखवत रेल्वे इंजिनचा वेग हळूहळू कमी करून रेल्वे थांबविली. तोपर्यंत इंजिन दोन जनरल बोगीचे डब्बे घेऊन जवळपास 300 मीटर पुढे गेले होते. मात्र, रुळावरून डब्बेन घसरल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. एक तासाच्या प्रयत्नानंतर नवीन कप्लिंग लावल्यानंतर सर्व रेल्वे वाहतूक सुरळीत झाली.
गती कमी असल्याने डबे घसरले नाही -
गोंदियावरून सुटणारी विदर्भ एक्सप्रेस ही भंडारा रेल्वे स्टेशनवर 4 वाजताच्या दरम्यान पोहोचल्यानंतर काही काळांनी ती पुढे गेली. स्टेशनवरून पुढे एक किलोमीटर अंतरावरच हा अपघात झाला. तेव्हा गाडीची गतीही कमी असल्याने एक्स्प्रेसचे डब्बे रुळांवरून घसरले नाहीत. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. हे डबे एका ठिकाणी थांबताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
एक तासानंतर नवीन कप्लिंग बसविली -