महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदी काका गेले.. नाना भाऊ आले, भंडाऱ्यात भाजी विक्रेत्यांची नवी शक्कल - new trick for sale peas at bhandara

भंडाऱ्यातील एका भाजी विक्रेत्याने शक्कल लढवत मोदी काका गेले नाना भाऊ आले, असे म्हणत मटार विकत आहेत. त्यांना ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मटार विकताना विक्रेते
मटार विकताना विक्रेते

By

Published : Dec 5, 2019, 11:10 AM IST

Updated : Dec 5, 2019, 11:57 AM IST

भंडारा- बाजारात वस्तूंची विक्री करताना कोण कधी कोणती युक्ती लढवेल हे सांगता येत नाही. भंडाऱ्यातील मटार विक्रेत्या शेतकऱ्याने एक वेगळीच शक्कल लढविली. हे विक्रेते मोदी काका गेलेत आणि नानाभाऊ आले म्हणून मटार पन्नास रुपये मध्ये दोन किलो झाले, असे म्हणत हिरवे मटाराची विक्री सुरू केली आहे. त्यांच्या या नवीन युक्तीमुळे त्यांचे ग्राहकसुद्धा वाढले असल्याचे हे विक्रेते सांगत आहेत.

भंडाऱ्यात भाजी विक्रेत्यांची नवी शक्कल


भंडारा जिल्ह्यात नाना पटोले यांचा मोठा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. विशेष करून शेतकरी वर्गात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये नाना मोठे प्रसिद्ध आहेत. नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष पद मिळाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद पसरला भंडारा शहराच्या राजीव गांधी चौकात भाजी विकणाऱ्या दोन किरकोळ विक्रेत्यांनी नाना पटोले सत्तेवर येण्याचा आनंद काही वेगळ्याच पद्धतीने साजरा केला.


राजीव गांधी चौकामध्ये शेख करीम आणि राजा खान हे दोन मित्र किरकोळ भाजी विक्रीचे काम करतात. हे दोघेही नाना पटोलोंचे चाहते आहेत. नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष पद मिळाल्याचे माहीत होताच त्यांनी नाना पटोलेंच्या नावाने मटार विकायला सुरुवात केली.


मोदी काका गेले आणि नानाभाऊ आले मटार पन्नास रुपयांत दोन किलो झाले, नानाभाऊ के बगीचे का माल, आला आला नानाभाऊ आला असे मोठ्याने ओरडत मटार विकू लागले. मटार विकण्याच्या या नवीन पद्धतीने लोकही त्यांच्याकडून मटार घेण्यासाठी गर्दी करू लागले. पूर्वी दिवसातून तीन ते चार पोते मटार विकणाऱ्या या मित्रांच्या व्यवसाय दुप्पटीने वाढला. एका ग्राहकाला ही पद्धत एवढी आवडली की त्यांनी या दोघांच्याही ज्ञानी मनी नसताना एक व्हिडिओ बनविला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यांची ही पद्धत सर्वांनाच आवडू लागली आणि पाहता पाहता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात संपूर्ण व्हायरल झाला.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मोदींना विरोध करणारे साकोलीचे नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध


विधानसभेत मोठ्या नेत्यांना टक्कर देऊन नाना पटोले जिंकून आले. ते सर्वसामान्य लोकांचे आणि शेतकऱ्यांचे नेते असल्यामुळे आम्हाला चांगले दिवस येतील. त्यामुळे आम्ही नाना पटोले यांच्या नावाने कमीत कमी पैशात लोकांना भाजीपाला विकत आहोत आणि ग्राहक मोठ्या प्रमाणात येत आहेत, असे या विक्रेत्यांनी सांगितले.

हेही वाचा - भंडाऱ्यात आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची फसवणूक; 52 कोटी थकवले

Last Updated : Dec 5, 2019, 11:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details