भंडारा - पवनी तालुक्यातील वैनगंगेच्या पुलावरून अज्ञात व्यक्तीने सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.
नेहमी वर्दळीच्या असलेल्या वैनगंगा पुलावर एक व्यक्ती ये-जा करत होता. पण, त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. नेहमीप्रमाणे एखादा प्रवासी असावा असे नागरिकांना वाटत होते. मात्र, त्याने अचानक पुलावरून उडी घेतली. तो उडी घेत असताना काही लोकांनी त्याला बघितले. त्यांनी वाचविण्यासाठी मदतही मागितली, पोलिसांना बोलाविण्यात आले, ढिवर समाजाच्या लोकांनी पाण्यात उतरून त्याचा शोध घेतला आणि काही वेळानंतर त्याला शोधण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.