महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाखांदूर तालुक्यात ट्रक-दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू - rushi Khobragade accidental death

लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी येथे ट्रक दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ऋषी गोविंदा खोब्रागडे (वय 42 रा. ताळगाव जि. गोंदिया) व मनीराम शेंडे (वय 35 रा. पिंपळगाव कोहळी) अशी मृतांची नावे आहेत.

Truck bike accident Lakhandur
लाखांदूर तालुक्यात ट्रक-दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

By

Published : Jan 2, 2021, 8:04 PM IST

भंडारा - लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी येथे ट्रक दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ऋषी गोविंदा खोब्रागडे (वय 42 रा. ताळगाव जि. गोंदिया) व मनीराम शेंडे (वय 35 रा. पिंपळगाव कोहळी) अशी मृतांची नावे आहेत.

ट्रक-दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

हेही वाचा -मोहंगाव देवी शाळेतील विद्यार्थ्यांचा नववर्षात व्यसनमुक्तीचा जागर

ऋषी खोब्रागडे हे त्यांच्या दुचाकीने (क्र. एम.एच 35 क्यू 7925) मनिराम शेंडे यांच्याबरोबर लाखांदूरच्या दिशेने चालले होते. दरम्यान, पिंपळगाव कोहळी पुढील नहरा समोर काही अंतरावर दुचाकी आणि ट्रकची (क्र. सीजी 08 एल 2125) समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील खोब्रागडे आणि शेंडे हे दोघेही 50 फूट उंच फेकल्या गेले. यामध्ये दोघांच्याही डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

गावकऱ्यांनी ट्रक चालकाला पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

घटना होताच प्रत्यक्षदर्शी लोकांनी याची माहिती लाखांदूर पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवले. घटनेनंतर ट्रक चालक दुचाकी बाजूला करून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता, मात्र प्रत्यक्षदर्शींनी त्यास अडवून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी ट्रक चालक (रामेश्वर शाहू रा. पटपर छत्तीसगड) व वाहक अशोक कुमार यादव (रा. रामपूर) यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा -कडाक्याच्या थंडीत फोनवर बोलणे पडले महागात, तरुणाचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details