भंडारा- शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर भिलेवाडा गावाजवळी पेट्रोल पंपाजवळ मालवाहू चारचाकी वाहन पंक्चर झाले होते. त्यामुळे चालक व क्लीनर टायर बदलत होते. त्यावेळी एका भरधाव चारचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघाता दोघे ठार झाले तर चौघे जखमी झाले आहेत.
पंक्चर झालेल्या वाहनाचे टायर बदलत होते, मग झाले असे... - चारचाकी
चारचाकीचे टायर पंक्चर झाले. चालक व क्लीनर स्टेपनी बदलत होते. मागून एक चारचाकी काळ बनून आली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.
नागपूर ते साकोलीच्या दिशेने जाणारी मालवाहू चारचाकी (क्र. एम एच 19 सी वाय 3463) ही भिलेवाडा गावाजवळ पंक्चर झाली. गाडी रस्त्याच्या बाजूला लावून चालक व क्लीनर हे पंक्चर झालेले चाक बदलून स्टेप्नी लावत असताना नागपूर ते साकोलीच्या दिशेने भरधाव जात असलेल्या चारचाकीने (क्र. एम एच 22 एस 400) दोघांनाही जोरदार धडक दिली व फरफटत नेले. त्यानंतर चारचाकी पुढे जाऊन उलटली. अपघात एवढा भीषण होता मालवाहू चारचाकीचे चालक व क्लीनरचा जागीच मृत्यू झाला तर गाडी उलटल्यामुळे गाडीत बसलेले चार जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत चालक व क्लीनर यांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. सध्या मृत चालक व क्लीनर यांची ओळख पटली नाही.
हेही वाचा - रविवारची रात्र ठरली 'काळ रात्र', राज्यात तीन अपघातात 17 ठार