महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पवनीमध्ये भरला आधुनिक ट्रॅक्टर पोळा - आधुनिक ट्रॅक्टर पोळा पवनी

शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणून बैलपोळा साजरा केला जातो. मात्र, आधुनिक काळात बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी चक्क ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन केले आहे. 50 हून अधिक शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन या ट्रॅक्टर पोळ्यात सहभागी झाले होते.

पवनी मध्ये भरला आधुनिक ट्रॅक्टर पोळा

By

Published : Aug 30, 2019, 7:52 PM IST

Updated : Aug 30, 2019, 7:57 PM IST

भंडारा - शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणून बैलपोळा साजरा केला जातो. मात्र, आधुनिक काळात बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी चक्क ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन केले आहे. 50 हून अधिक शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन या ट्रॅक्टर पोळ्यात सहभागी झाले होते. दरम्यान हा ट्रॅक्टर पोळा नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला होता.

पवनी मध्ये भरला आधुनिक ट्रॅक्टर पोळा

ट्रॅक्टर मालकांनी सणानिमित्त ट्रॅक्टरचा अजिबात उपयोग केला नाही. ट्रॅक्टरला स्वच्छ धुऊन काढले. त्यानंतर विविध पद्धतीने हार-तुरे लावून हे ट्रॅक्टर सजवण्यात आले. एका ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरच्या दर्शनी भागाला चक्क बैलाच्या तोंडाची प्रतिकृती बांधली होती. सर्व ट्रॅक्टर एका ठिकाणी गोळा करण्यात आले. हा सर्व प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

आकर्षक सजावट करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना पारितोषिकही देण्यात आले. तर, इतर सर्व सहभागींना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ट्रॅक्टर पोळ्याचा उत्साह वाढविण्यासाठी भंडारा क्षेत्राचे आमदार रामचंद्र अवसरे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये आदी उपस्थित होते.

Last Updated : Aug 30, 2019, 7:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details