भंडारा -आजचा दिवस(सोमवार) हा भंडारा जिल्ह्यासाठी समाधानकारक ठरलेला आहे. जिल्ह्यात आज तब्बल 47 रुग्णांना एकाच वेळेस डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज एक व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील एक व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 154 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 199 झाली असून, 43 रुग्ण हे क्रियाशील आहेत. आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या 2 आहे.
मागील पाच दिवसांपासून भंडारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट निर्माण झाली आहे. त्यातच सोमवारी तब्बल 47 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर फक्त एक रुग्ण हा पॉझिटिव्ह आढळलेला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या 199 पर्यंत पोहोचली असली तरी आत्तापर्यंत 154 लोकांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. त्यामुळे क्रियाशील रुग्णांची संख्या 43 उरली आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी 49 रुग्ण आढळले होते. त्या रुग्णांपैकी 47 रुग्णांना आज सुट्टी देण्यात आली आहे.
भंडाऱ्यात एकाच दिवशी 47 रुग्णांनी केली कोरोनावर मात - भंडारा कोरोना न्यूज
भंडारा जिल्ह्यात आज तब्बल 47 रुग्णांना एकाचवेळेस डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज एक व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये भंडारा तालुक्यातील एक व्यक्तीचा समावेश आहे.
भंडाऱ्यात एकाच दिवशी 47 रुग्णांनी केली कोरोनावर मात
सुरुवातीला जिल्ह्याच्या बाहेरून आलेले नागरिक हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. यामध्ये सर्वात जास्त, हे मजूर वर्गातील लोक होते. मात्र, आजघडीला जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लक्षणे आढळून येत आहेत. मात्र, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी, प्रशासन प्रयत्न करत आहे, तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाहीसुद्धा होत आहे.