भंडारा - तीन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखांदूर तालुक्यातल्या भुयार गावात घडली आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी ही घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.यातील एक भाऊ शेळ्या धुण्यासाठी तलावात उतरला होता. मात्र तो बुडत असल्याचे पाहून इतर दोन भाऊ त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र दुर्दैवाने या तिघांचाही यात मृत्यू झाला. घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने या तिघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
मधूकर निलकंठ मेश्राम वय 45 वर्ष, सुधाकर निलकंठ मेश्राम वय 43 वर्ष आणि प्रदीप निलकंठ मेश्राम वय 39 वर्ष असे या तीन मृतांची नावे आहेत. मधुकर मेश्राम हा शेळ्या घेऊन तलावात उतरला. तलावातील पाण्याचा नेमका अंदाज न आल्यामुळे शेळ्या पाण्यात बुडायला लागल्या. मधुकर हा शेळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र या घटनेत तो स्वता: बुडाला. भाऊ बूडत असल्याचे पाहून, त्याचे दोन भाऊ त्याला वाचवण्यासाठी तलावात उतरले मात्र, ते देखील बुडाले. ऐन दिवाळीच्या दिवशी ही घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.