महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा : ऋषीपंचमीनिमित्त वैनगंगा नदीकिनारी हजारो महिलांची पवित्र स्नानसाठी गर्दी - वैनगंगा नदि बातमी

ऋषि पंचमीच्या पावन पर्वावर विदर्भातील काशी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नदि तिरावर हजोरो महिलानी पवित्र स्नान केले. हे व्रत गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी केले जाते.

पवनीच्या वैनगंगा नदीवर ऋषीपंचमीला हजारो महिलांची पवित्र स्नानसाठी गर्दी

By

Published : Sep 3, 2019, 8:57 PM IST

भंडारा -ऋषि पंचमीच्या पावन पर्वावर विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या पवनी शहरातील वैनगंगा नदी तिरावर वैजेश्वर घाटावर विदर्भातून आलेल्या हजारो महिलानी पवित्र स्नान करुन आपले व्रत सोडले. आपल्या भारताच नव्हे तर संपूर्ण विश्वात आपल्या ऋषिमुनींबद्दल आदर आहे. याच ऋषिमुनीं बद्दल आपणास आदर निष्ठा भक्ति व्यक्त करने हेच ऋषिपंचमीचे प्रयोजन आहे. गणपतीचे आगमन झाल्यानंतर दूसऱ्या दिवशी ऋषिपंचमीचे व्रत महिलांकडून केले जाते.

भंडारा : ऋषीपंचमीनिमित्त वैनगंगा नदीव हजारो महिलांची पवित्र स्नानसाठी गर्दी

ऋषिपंचमी दिवशी स्त्रियां रजस्वला अवस्थेत असताना चुकून झालेले दोष दूर करण्याकरता अरुंधति, कश्यापी ऋषि यांना प्रसन्न करण्याकरता सप्तऋषींचे पूजन करतात. पूजा केल्यानंतर उपवास सोडण्याकरता परसबागेतील भाज्यांचा वापर केला जातो. जिथे बैलाच्या पायाचा स्पर्श झालेला नाही. यात प्रामुख्याने देव तांदूळ (लाल तांदूळ), दुधी, दोडकी आणि अन्य हिरव्या भाजीचा वापर केला जातो. रजस्वला दोष नाहीसा करण्यासाठी प्रायश्चित म्हणून हे व्रत केले जाते. ऋषिपंचमिला हे व्रत केल्याने मासिक पाळी, स्पर्धस्पर्ष याचा स्त्रीयावर होणारा परिणाम या व्रताने कमी होत असल्याचे महिला समजतात.

हेही वाचा - लालबागच्या राजाचं २४ तास LIVE दर्शन... एका क्लिकवर

पवनी शहर हे प्राचीन ऐतिहासिक असून इथे 350च्या वर मंदिर येथे आहेत. यामुळे हे शहर मंदिराचे शहर म्हणून नावारूपाला आले. पवनि येथील वैनगंगा तिरावरिल वैशिष्ट्य म्हणजे नदीपात्रात विशिष्ट ठिकाणी बेलाचे पान टाकले असता पाण्यात बुडतात. हिंदू धर्मात मान्यता आहे, की जिथे शिवपिंडी असते तिथे बेलाची पाने बुडतात. ऋषिपंचमिला विदर्भातील रजोनिव्रुत्त महिला पवित्र स्नान करायला मिळेल त्या वाहनाने पवनिला येतात . वैनगंगा नदिपात्रात पवित्र स्नान केल्या नंतर जवळच वेजेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीची पूजा करुण देव धानाच्या तांदळाचा भात व अश्या ठिकानची भाजी जिथे बैलाचे पाय लागणार नाही अश्या प्रकारच्या वस्तु पासून बनवीलेले जेवन तयार करुण आपले व्रत सोडतात.

हेही वाचा - 'बिग बॉस' विजेता शिव ठाकरेचं अमरावतीत जल्लोषी स्वागत, गणरायाचीही केली स्थापना

ऋषी पंचमीच्या पर्वावर जवळपास 25 हजार महिला या वर्षी याठीकानी आल्या होत्या. वैनगंगा नदी सध्या दुथडी भरून वाहत असल्याने अनुचित घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनातील बचाव पथक आणि स्वयंसेवी नदीपात्रात आणि नदी तीरावर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details