मोहाडी (भंडारा)- कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी तयार केलेला तंबू कोसळल्याने एक महिला जखमी झाली आहे. ई-पाससाठी लागणारी आरोग्य तपासणी करण्यासाठी हे तंबू उभे केले होते. हे तंबू कोसळल्याने कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी आता जागा उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.
मोहाडी तालुक्यातील कोविड केअर सेंटर हे महिला आर्थिक विकास मंडळाच्या इमारतीमध्ये स्थापित करण्यात आले होते. येथूनच कोरोनासंबंधित वैद्यकीय तपासण्या आणि आरोग्य प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, 15 दिवसांपूर्वी मविमच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीतून आरोग्य तपासणीचे केंद्र रिकामे करून घेतली. शेवटी तात्पुरती व्यवस्था म्हणून इमारतीच्या समोरच्या भागात तंबू टाकून काम सुरू करण्यात आले. मात्र, निदान व वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना भर उन्हात आणि पावसात उभे राहावे लागत होते.
भंडाऱ्यात कोरोना तपासणीसाठी उभा केलेला तंबू कोसळून महिला जखमी - भंडारा कोविड केअर सेंटर बातमी
मगील 2-3 महिन्यांपासून भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात असलेल्या महिला विकास महामंडाळाच्या इमारती समोरील एका खोलीत कोविड केअर सुरू होते. मात्र, काही दिवसांपूर्वी मविमच्या अधिकाऱ्यांनी ती खोली रिकामी करण्यास सांगितल्याने त्याच परिसरात एक तंबू बांधून कोरोना चाचणी प्रमाणपत्र दिले जात होते. मात्र, नागरिकांसाठी या ठिकाणी कोणतीच सोय नव्हती. आज आलेल्या पावसामुळे तंबू कोसळला. त्यामुळे एक महिला जखमी झाली आहे.
गुरुवारी (दि. 6 ऑगस्ट) 65 वर्षीय एक वृद्ध महिला कोरोनाची चाचणी करुन घेण्यासाठी आली होती. त्यावेळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. तेव्हा ती महिला ओली चिंब झाली व ती पावसापासून वाचण्यासाठी जेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तंबूत आली, तेव्हा जोरदार वाऱ्यामुळे हा तंबू कोसळला आणि त्या महिलेच्या डोक्याला गंभीर ईजा झाली. ती खाली कोसळली. या घटनेची माहिती तहसीलदार व संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
मागील 2-3 महिन्यांपासून मविम इमारतीच्या समोरील खोलीत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी काम करत होते. पण, काही दिवसांपूर्वी त्यांनी अरेरावी करुन ही खोली खाली करुन घेतली. त्या दिवसापासून वैद्यकीय अधिकारी हे तंबूत कार्य करत आहेत. मात्र, कोरोना निदान आणि प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या लोकांसाठी याठिकाणी कोणतीच पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही.