भंडारा -जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 13 जागा व पंचायत समितीच्या 25 जागांसाठी तसेच, 3 नगर पंचायतीच्या 12 जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली आहे. सकाळी मतदान सुरू असले तरी थंडीचा प्रभाव मतदानावर पाहायला मिळत आहे. दुसऱ्या टप्प्यातील या मतदानासाठी 3 लाख 67 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा -Husband-Wife Death : घरगुती भांडणात अंगावर रॉकेल ओतून पती-पत्नीचा मृत्यू; चिमुकला बचावला
सकाळी मतदान संथ गतीने सुरू
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 21 डिसेंबर रोजी झाले होते. तर, 18 जानेवारीला दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली असून, सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान सुरू राहील. मतदानाला सकाळी सुरवात झाली असली तरी, या मतदानावरही सकाळी थंडीचा प्रभाव पाहायला मिळाला. थंडीमुळे मतदार सकाळी मतदान केंद्रांवर अतिशय तुरळक प्रमाणात पोहोचले, त्यामुळे सकाळी नऊ वाजता मतदानाचा टक्केवारीचा प्रमाण हा खूप कमी असेल. मात्र, दुपारनंतर मतदार घराबाहेर निघतील आणि मतदानाची टक्केवारी वाढेल, अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात 70.33 टक्के मतदान झाले होते.