भंडारा - जिल्ह्यामधील राजेगाव येथे अशोक लेलैंड कंपनी लिमिटेडने केलेले अतिक्रमन हटवण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी बहुमताने ठराव पास केला आहे. हा ठराव भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना पाठविन्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत कंपनीवर कारवाई न झाल्यास संपूर्ण गावकारी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद आमरण उपोषणला बसणार आहेत.
जिल्ह्यातील राजेगाव अंतर्गत येत असलेल्या चिखली हमेशा (रीति गाव) येथे अशोक लेलैंड कंपनी लिमिटेडने 1982 पासून 26 एकर जमीनीवर पक्के बांधकाम करत अतिक्रमण केले आहे.
वारंवार पत्र देऊन ही कंपनी कोणतीही दखल घेत नसल्याने त्याविरोधात भंडारा जिल्हाधिकारी यांना तक्रार दाखल करण्यात होती. मात्र आजपर्यंत कंपनीविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही.