भंडारा-मागील दीड वर्षांपासून धान खरेदी केंद्रावर काम करणाऱ्या हमालांना (माथाडी कामगार) हमालीचे लाखो रूपये तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेने न दिल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर मोठी दीघोरी येथे समोर आला आहे. हमालांकडून काम करवून घेण्यात आले. मात्र, मोबदल्यात त्यांना अद्यापही हमालीचे पैसे देण्यात न आल्याने त्यांच्यावर उपाषमारीची वेळ आली आहे. परिणामी तालुका खरेदी विक्री संस्थेच्याविरोधात हमालांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे.
दीड वर्षात पैसेच दिले नाही
2019-20 वर्षात तालुका खरेदी विक्री संस्थेने हमालांकडून धान खरेदी केंद्रावर हमालीचे काम करवून घेण्यात आले. मात्र, हमाली देण्यात आली नाही. तर 2020-21 या वर्षातील धान खरेदी काम पूर्ण झाले असतानाही यावर्षीचीही हमाली देण्यात आली नाही. आधीच कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे हमाल संकटात असताना दीड वर्षापासून रब्बी आणि खरिपाचे हमालीचे पैसे देण्यात न आल्याने त्यांनी घरप्रपंच कसा चालवायचा, असा सवाल त्यांचेसमोर उभा ठाकला आहे. या संस्थेत जवळपास 30 हमाल कार्यरत आहेत. त्यामुळे या मजुरांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
संस्था मालक बोलण्यास तयार नाही