भंडारा : माडगी येथे वैनगंगा नदीच्या (Wainganga River) मधोमध असलेल्या नरसिंह मंदिरामध्ये (Narsingh Mandir Bhandara) गुरूपौर्णिमा निमित्ताने आंधळगाव (Andhalgaon), मोहाडी (Mohadi), तुमसर येथील 15 भाविक दर्शनासाठी गेले होते. यामध्ये सात स्त्रिया व आठ पुरुषांचा समावेश होता. पूजा करण्यासाठी गेले असता नदीतील पाण्याची पातळी खूप कमी होती. मात्र जोरदार पावसामुळे नदीपात्राच्या पाण्यामध्ये वाढ झाली आणि त्यामुळे या भाविकांना परत निघता आले नाही. भाविक तिथेच फसून राहिल्याने त्यांनी या संबंधाची माहिती जिल्हा प्रशासनाला आणि काही राजकीय नेत्यांनाही दिली आणि त्यानंतर या भाविकांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अखेर 19 तासानंतर भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यास राज्य आपत्ति प्रतिसाद दलाच्या रेस्क्यू (Successfully Rescued) टीमला यश आले आहे.
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला केले पाचारण - नदीपात्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे स्थानिक लोकांनी त्यांच्या छोट्या नावेतून या नागरिकांना आणण्याची हिंमत केली नाही. शेवटी प्रशासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण केले. त्यानुसार आपत्ती दलाची एक टीम बुधवारी रात्री नऊच्या दरम्यान माडगी येथे पोहोचली. मात्र तोपर्यंत अंधार झाला होता आणि या लोकांना या नदी विषयी माहिती नव्हती. आणि पाण्याच्या प्रवाह ही अधिक असल्याने रात्रीला रेस्क्यू करणे धोकादायक ठरू शकत होते. शेवटी रेस्क्यू टीमने फसलेल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर ते सुखरूप असल्याचे समजले. ( Bhandara Rain Update ) त्यानंतर त्यांना सकाळी रेस्क्यू करण्याचा निर्णय घेतला. सकाळी 6 वाजता या टीमने दोन बोटीच्या माध्यमातून अडीच तासाच्या प्रयत्नात या सर्व 15 ही लोकांना नदीपात्रातून सुखरूप बाहेर काढले.(The Devotees Are Successfully Rescued) बाहेर आल्यानंतर या रेस्क्यू टीम मुळे आम्ही बाहेर येऊ शकलो अन्यथा आम्ही तिथेच अडकून बसलो असतो अशी भावना अडकलेल्या लोकांनी व्यक्त केली आहे.
भंडारा - गोसीखुर्द धरणाचे संपूर्ण 33 पैकी 33 दरवाजे उघडले गेले असून 12 दरवाजे अर्ध्या मीटरने तर 21 दरवाजे 1 मीटरने उघडले गेले आहे. संपूर्ण 33 दारातून 5955.85 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हवामान खात्याने भंडारा जिल्ह्याला येल्लो अलर्ट दिला असून मागील 24 तासांमध्ये सात पैकी पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. नदी नाले दुथडी वरून वाहत असून तुमसर तालुक्यामध्ये सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला असून लोकांच्या घरात सुद्धा पाणी गेलेला आहे.
या मोसमात पहिल्यांदाच उघडले गेले 33 ही गेट -मागील 24 तासात संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने तसेच गोसीखुर्द पानलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरु असल्यामुळे धरणात पाण्याची आवक सतत होत होती त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित आणण्यासाठी गोसीखुर्द धरणाच्या प्रशासनाने संपूर्ण 33 दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. दर तासाला धरणात येणाऱ्या पावसाचा प्रवाह लक्षात घेऊन दार उघडण्याचे प्रमाण कमी ज्यास्त केले जात आहे. 12 वाजे ला गोसे धरणाचे 12 दार हे अर्ध्या मीटर ने उघडले होते तर 21 दार हे 1 मीटर ने उघडण्यात आले होते. यामधून 5955.85 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत असल्याने मासेमार बांधवाना नदी पात्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय नदी काठावरील गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.