भंडारा - तालुक्यातील पालगाव येथे असलेल्या उमा प्लास्टीक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी सहा वाजेपासून ही आग लागली असून दुपारी बारापर्यंत ही आग विझविण्याचे काम सुरू होते. आगीमध्ये जवळपास 80 ते 1 करोड रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कंपनी मालकांनी व्यक्त केला आहे. आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कंपनीमध्ये असलेल्या केमिकल बॅगमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पालगावातील उमा प्लास्टिक कंपनीला भीषण आग; कच्चा माल जळून खाक - भंडारा लेटेस्ट न्यूज
आग नेमकी कशामुळे लागली ही सध्या सांगता येत नसले तरी कंपनीमध्ये उत्पादन घेण्यासाठी असलेली केमिकल बॅग ओली झाल्यास ती जाळायला सुरुवात होते आणि त्यातून ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज कंपनीच्या मालकांनी व्यक्त केला आहे.
अग्निशामकच्या माध्यमातून कंपनीमध्ये लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, कंपनीच्या परिसरात असलेला कच्च्या प्लास्टिक मालावर नियंत्रण मिळविणे अग्निशामक गाळ्यांना शक्य होत नव्हते. सकाळी सहा वाजता लागलेली आज दुपारी 12 नंतर विझविण्याचे काम सुरू होते. पुढेही दोन-तीन तास ही संपूर्ण आग विझवण्यासाठी लागेल असे कंपनीच्या मालकांनी सांगितले.
जवळपास 80 लाख ते एक करोडरुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज
मागील दहा वर्षापासून ही कंपनी इथे प्लास्टिकच्या मालाला रिसायकलिंग करून प्लास्टिक निर्मितीसाठी लागणाऱ्या बारीक दाना तयार करते. आज लागलेल्या आगीमध्ये कच्चामाल जवळपास पूर्णपणे जळलेला असून तयार झालेला मालक ही बऱ्याच प्रमाणात जळलेला आहे. एकंदरीतच या आगीत 80 लाख ते 1 करोड रुपयांचा नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कंपनी मालकांनी व्यक्त केला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली ही सध्या सांगता येत नसले तरी कंपनीमध्ये उत्पादन घेण्यासाठी असलेली केमिकल बॅग ओली झाल्यास ती जाळायला सुरुवात होते आणि त्यातून ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज कंपनीच्या मालकांनी व्यक्त केला आहे.