भंडारा -कोरोना नियम न पाळणाऱ्या लोकांवर प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे. विशेषतः लग्न समारंभ सुरु असलेल्या गर्दीच्या ठिकाणी हे नियम पाळले जातात. की नाही, यावर प्रशासनाची करडी नजर आहे. मागील तीन दिवसांमध्ये भंडारा तहसीलदार अक्षय पोयाम यांनी दोन सभागृहावर प्रथम दंडात्मक कारवाई केली. मात्र या नंतरही नियम न पाळणाऱ्या भंडारा शहरातील श्यामसुंदर लॉनला सील केले आहे.
सलग दोन दिवस दंडात्मक कारवाई -
सध्या भंडारा जिल्ह्यात 28 जून पासून तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध सुरू आहेत. या निर्बंधानुसार लग्नसमारंभासाठी केवळ पन्नास लोकांना परवानगी आहे. त्या अगोदर शंभर लोकांना परवानगी होती. मात्र प्रत्येक वेळेस लग्नसमारंभात दीडशे पेक्षा जास्त नागरिक एकत्र येतात. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या सभागृहावर लक्ष ठेवण्यास सांगितले. त्यानुसार भंडारा उपविभागीय अधिकारी आणि भंडारा तहसीलदार यांनी मागील तीन दिवसात दोन सभागृहांवर दंडात्मक कारवाई केली. 26 जूनला ठाणा येथील बावनकुळे सभागृहावर दहा हजाराचा दंड ठोठावला. यापुढे अशी चुकी केल्यास सभागृह सील केल्या जाईल, अशी सूचनाही त्यांना देण्यात आली. त्यानंतर 27 जूनला श्यामसुंदर लॉन येथेही निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त नागरिक असल्याने या लॉन मालकावरही दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला. यापुढे नियम मोडल्यास सभागृह सील करण्यात येईल, अशा सुचना देखील करण्यात आल्या होत्या.
दुसऱ्याच दिवशी नियमांना हरताळ -