महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खुल्या जलतरण स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद, नाना पटोलेंचीही उपस्थिती - वीरधवल खाडे

गेल्या ४ वर्षांपासून 'शिवणीबांध' या तलावावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. हा तलाव मास्यांसाठी प्रसिद्ध असला तरी गेल्या काही वर्षांपासून हा परिसर या स्पर्धेमुळे प्रकाशझोतात आला आहे.

swimming
खुल्या जलतरण स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद, नाना पटोलेंचीही उपस्थिती

By

Published : Feb 17, 2020, 8:31 PM IST

Updated : Feb 17, 2020, 10:03 PM IST

भंडारा- तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या भंडाराच्या साकोली तालुक्यात सोमवारी खुल्या जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील जलतरणपटुंचे मनोबल वाढवण्यासाठी या भागाचे आमदार आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेदेखील जलाशयावर उपस्थित होते.

खुल्या जलतरण स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद, नाना पटोलेंचीही उपस्थिती

गेल्या ४ वर्षांपासून 'शिवणीबांध' या तलावावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. हा तलाव मास्यांसाठी प्रसिद्ध असला तरी गेल्या काही वर्षांपासून हा परिसर या स्पर्धेमुळे प्रकाशझोतात आला आहे. या स्पर्धेत राज्यातून वयाचा ८ व्या वर्षापासून ते ७० वयोगटापर्यंतच्या २०० जलतरणपटुंनी सहभाग घेतला होता.

हेही वाचा -नाराजी नाट्य..! भास्कर जाधवांनी व्यासपीठावरच झटकला राऊतांचा हात

आजुबाजुच्या २० गावांमधील नागरिक या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी गर्दी करत असतात. याच तलावावर पोहोण्याचा सराव करून जिल्ह्यातील जलतरणपटुंनी मालवणच्या समुद्रात घेण्यात आलेल्या स्पर्धेत सहभाग घेऊन बक्षिसे पटाकवली होती.

Last Updated : Feb 17, 2020, 10:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details