भंडारा- जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी अचानक झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले. खासदार सुनिल मेंढे यांनी तहसीलदारासमवेत याची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी तात्काळ अहवाल पाठवून शेतकऱ्यांना शक्य तेवढी नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
अवकाळी पावसामुळे रब्बीचे नुकसान, खासदार सुनिल मेंढे यांनी केली पाहणी - खासदार सुनिल मेंढे
भंडारा जिल्ह्याच्या हवामान खात्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. साकोली शहर, तुमसर तालुक्यातील देव्हाडी, भंडाऱ्यातील पांढराबोडी, हत्तीडोई आणि दाभा या गावामध्ये मोठा पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी पिकांसह वांगे, टोमॅटो या पिकांचे नुकसान झाले.

भंडारा-गोंदियाचे खासदार सुनिल मेंढे यांनी तहसीलदारसमवेत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यानंतर त्यांनी नुकसान भरपाई देण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे.