महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांना आणखी काही महिने करावी लागणार प्रतीक्षा

नुकत्याच झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीत भाजपचे सुनील मेंढे हे खासदार म्हणून निवडून आले. ते सध्या भंडारा नगर पालिकेचे नगराध्यक्षही आहेत. मात्र, खासदार झाल्यानंतरही मेंढे यांनी अजूनही किमान ५ ते ६ महिने अध्यक्ष पद सोडणार नाही, अशी माहिती बाहेर पडताच नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी पडले.

By

Published : Jun 2, 2019, 9:33 AM IST

नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांना आणखी काही महिने करावी लागणार प्रतीक्षा

भंडारा- भंडारा नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष खासदार म्हणून नुकतेच निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीनंतर नगराध्यक्षाचे पद रिकामे होईल आणि आपल्याला संधी मिळेल या प्रतीक्षेत असणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना अजूनतरी काही महिने प्रतीक्षा करावी लागेल. कारण, मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान नगराध्यक्ष अजून तरी काही महिने राजीनामा देणार नाहीत.

नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांना आणखी काही महिने करावी लागणार प्रतीक्षा

नुकत्याच झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीत भाजपचे सुनील मेंढे हे खासदार म्हणून निवडून आले. ते सध्या भंडारा नगर पालिकेचे नगराध्यक्षही आहेत. सुनिल मेंढे यांना खासदारकीचे तिकीट मिळताच पक्षातील इच्छुकांनी मेंढे यांच्या विजयासाठी ईश्वरकडे प्रार्थना केली. त्याप्रमाणे मेंढे खासदार झालेही. मात्र, खासदार झाल्यानंतरही मेंढे यांनी अजूनही किमान ५ ते ६ महिने अध्यक्ष पद सोडणार नाही, अशी माहिती बाहेर पडताच इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी पडले.

सध्या भाजपतर्फे नगरसेवक संजय कुंभलकर, स्वीकृत सदस्य मंगेश वंजारी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर काँग्रेसतर्फे धनराज साठवणे यांनीही आपले प्रयत्न सुरू केले आहे. मात्र, सध्या ६ महिने थांबा आणि वाट पहा, अशीच भूमिका त्यांना पार पाडावी लागत आहे.

भंडारा नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप सत्तेवर आली आणि सुनील मेंढे भाजपच्या तिकिटावर लोकांमधून निवडून आले. मात्र, मागच्या अडीच वर्षाच्या कालावधीत त्यांचे आणि नगरसेवकांचे वैर सर्वश्रुत होते. तरीही खासदारकीची निवडणूक येताच हे सर्व नगरसेवक सुनील मेंढेच्या प्रचारासाठी अहोरात्र प्रयत्न केले. अपेक्षा एवढीच की भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून खासदार बदलवू आणि भंडारा नगरपालिकेतून अध्यक्ष बदलवू. मात्र, सध्यातरी असे होताना दिसत नसल्याने बिचारे इच्छुक केवळ नाईलाजास्तव प्रतीक्षा करीत आहेत. याविषयी त्यांना विचारले असता पक्षाचा निर्णय हा शेवटचा असेल. ते जेव्हा म्हणतील तेव्हा आणि ज्या व्यक्तीला उमेदवारी देतील त्याच्यासाठी प्रचार करू, अशी प्रतिक्रिया नगरसेवक संजय कुंभलकर यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details