महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मतदान जागृतीसाठी विद्यार्थी सरसावले, पथनाट्याद्वारे केले प्रबोधन

मतदान जागृतीसाठी भंडाऱ्यात शाळकरी मुलांनी रॅली काढली. यावेळी पथनाट्याद्वारे लोकांना मतदानाचे हक्क पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मतदान जनजागृतीसाठी भंडाऱ्यात विद्यार्थ्यांची रॅली

By

Published : Mar 16, 2019, 8:44 PM IST

भंडारा- ११ एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मतदाराने त्याच्या मतदानाचा हक्क पार पाडावे. मतदान हा तुमचा अधिकार आहे, ही जागृती मतदारांमध्ये निर्माण करण्यासाठी शाळकरी मुलांनी रॅली काढली. यावेळी पथनाट्याद्वारे लोकांना मतदानाचे हक्क पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

१७ व्या लोकसभेचे बिगुल वाजले आहे. भंडारा-गोंदिया या लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात म्हणजे ११ एप्रिलला मतदान होणार असून २३ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. सर्व राजकीय पक्ष आणि मतदार यांचे संपूर्ण लक्ष उमेदवार कोण असेल याकडे लागले असताना भंडाऱ्याच्या शाळकरी मुलांनी मात्र मतदान किती महत्त्वाचे हे पटवून देण्यासाठी स्वतः जागृती अभियान सुरू केले.

पोद्दार इंटरनॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढून ती गांधी चौकापर्यंत पोहोचले. रॅलीमध्ये मुलांच्या हातामध्ये वेगवेगळे घोषणा लिहिलेले बॅनर होते. मतदान तुमचा मौलिक अधिकार आहे. 'देश हित+आपले कर्तव्य= मतदान, तुमचा वोट तुमची ताकत बनेल, हे बॅनर घेऊन 'वोट फॉर इंडिया', 'सब काम छोड दो, सबसे पहिले वोट दो' हे नारे लावत विद्यार्थी शहरात निघाले होते.

गांधी चौकात पोहोचल्यावर या विद्यार्थ्यांनी एका पथनाट्याद्वारे शहरातील नागरिकांना मतदानाचे महत्व तुमचा अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. खरेतर मतदान करणे हे आमचे कर्तव्य आहे. या मतदानाच्या अधिकारातून आम्ही योग्य उमेदवाराची निवड करू शकतो याची जाणीव असूनही बरेचदा लोक मतदान करत नाहीत. शासन आपल्या परिने मतदारांना जागृत करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करीत असते. पण तरीही जे लोक मतदान करीत नाही, अशा लोकांना कमीत कमी या मुलांनी केलेल्या आव्हानाकडे लक्ष द्यावे. तसेच त्यांनी त्यांच्या अधिकाराची आणि कर्तव्याची जाणीव ठेवत ११ तारखेला आपल्या मतदानाचा हक्क पार पाडावे. जेणेकरून चांगले पुढारी आणि चांगले शासन आम्ही या मुलांना देऊ शकतो. त्यामुळे त्यांचे भविष्यही सुखरूप राहील.

ABOUT THE AUTHOR

...view details