भंडारा - जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सोनी या गावात मागील 20 वर्षांपासून एक प्रथा जोपासली जाते. या प्रथेनुसार दरवर्षी दिवाळीनंतर गावातील लग्न होऊन गेलेल्या मुलगी आणि जावायाचा सार्वजनिकरित्या सत्कार केला जातो. यावर्षीही 26 नवीन जोडप्यांचा शाल श्रीफळ आणि साडी देऊन सत्कार करण्यात आला.
दिवाळीनंतर केला जातो सत्कार -
40 वर्षांपासून 'या' गावात केला जातो जावई आणि मुलींचा सामूहिक सत्कार
मागील 20 वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातील सोनी या गावात एक प्रथा जोपासली जाते. या प्रथेनुसार दरवर्षी दिवाळीनंतर गावातील लग्न होऊन गेलेल्या मुलगी आणि जावायाचा सार्वजनिकरित्या सत्कार केला जातो.
प्रत्येक घरात एक मुलगी असावी, मुलगी असली म्हणजे घरात लक्ष्मी नांदते, सरस्वती वास करते, असे म्हटले जाते. पण या मुलीचे लग्न झाल्यानंतर ती आई वडिलांचे घर सोडून सासरी जाते. मात्र, आई-वडिलांशी असलेला ऋणानुबंध जोपासण्यासाठी सोनी या गावात दरवर्षी दिवाळीनंतर मुलींचा आणि जावायांच्या सत्काराचा कार्यक्रम घेतला जातो. दरवर्षी लग्न होऊन सासरी गेलेल्या या मुलींना दिवाळीनिमित्त घरी बोलावले जाते. घरी जो मानसन्मान त्यांना मिळाला हवा तो तर मिळतोच, सोबतच या नवीन जावईबापूंना आणि आपल्या पोरींना या गावात मान मिळावा, यासाठी सार्वजनिकरित्या त्यांच्या सार्वजनिक सत्काराचा कार्यक्रम ठेवला जातो. यावर्षीही 26 नवीन जोडप्यांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला. या मुलींना हळदीकुंकू लावून साडी-चोळी दिली जाते. तर जवाईबापूंचा शाल-श्रीफळ देऊन आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला जातो.
40 वर्षांपूर्वी सुरू झाली प्रथा -
सोनी गावातील दिवंगत सरपंच बळीरामबापू नखाते यांनी 1980साली गावातील नवीन जावाई व मुलींना घरी बोलावून आदरातिथ्य करण्यास सुरुवात केली होती. कालांतराने याला सार्वजनिक प्रथेचा मान मिळाला. सोनी गावातील गावकरी सहभागातून परिवर्तन सांस्कृतिक मंडळ स्थापन करत हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहाने पार पाडतात. विशेष म्हणजे ही परंपरा जोपासत असताना जाती धर्माचा भेद न ठेवता एकाच मंचावर शाल, श्रीफळ व साडी देऊन सोनी गावात मागील 40 वर्षांपासून ऋणानूबंधाचे नाते जपले जात आहे.
हेही वाचा -स्मार्ट तस्कर..! पॉवर बँक आणि इलेक्ट्रिक स्विचेसला फिट केले सोन्याचे स्क्रू