भंडारा - कुलरचा विद्युत शॉक लागलेल्या आईला वाचविण्याच्या प्रयत्नात एका 20 वर्षीय तरुण मुलाचा मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यात घडली आहे. तर या घटनेत आई गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
राजेश बळीराम तुमन्ने (वय 20 वर्षे) असे मृत मुलाचे नाव असून अनुसया बळीराम तुमन्ने (वय 45 वर्षे), असे जखमी आईचे नाव आहे.
आज (दि. 4मे) सकाळी अनुसया नेहमीप्रमाणे (आई) सकाळच्या सुमारास घरातील केरकचरा केरसुनीने काढत होती. यावेळी घरातील कुलरदेखील सुरु होता. मात्र, सबंधित अनुसया या कुलर जवळुन केरसुनिने केरकचरा काढत असताना अचानक त्यांना विद्युत प्रवाहित कुलरचा शॉक लागल्याने तिने आरडा-ओरड केली. यावेळी घरात झोपुन असलेला मुलगा आईच्या ओरडण्याचे आवाज ऐकुण झोपेतून ऊठुन सरळ धावत आला. तेव्हा त्यालादेखील कुलरच्या विजेचा शॉक लागला.