महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात कोणाचा दबदबा?

जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ असुन त्यांवर भाजपचे वर्चस्व आहे. 2019 मध्येही भाजप या तिन्ही ठिकाणी पुन्हा निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, नाना पटोले निवडणूकीच्या मैदानात उतरल्यास वेगळे चित्र पहायला मिळु शकते.

भंडारा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात कोणाचा दबदबा?

By

Published : Sep 18, 2019, 7:52 PM IST

भंडारा- जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ असून त्यांवर भाजपचे वर्चस्व आहे. 2019 मध्येही भाजप या तिन्ही ठिकाणी पुन्हा निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, नाना पटोले निवडणूकीच्या मैदानात उतरल्यास वेगळे चित्र पहायला मिळु शकते. भंडारा जिल्ह्यात एकुण 7 तालुके आहेत. 2009 पूर्वी जिल्ह्यात 5 विधानसभा क्षेत्र होते. मात्र, 2009 मध्ये पुनर्रचनेनंतर तीन विधानसभा क्षेत्र निर्माण केले गेले. भंडारा-पवनी मिळून भंडारा तर साकोली, लाखांदूर आणि लाखनी मिळून साकोली विधानसभा क्षेत्र, तुमसर-मोहाडी मिळून तुमसर विधानसभा क्षेत्राची रचना करण्यात आली.

भंडारा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात कोणाचा दबदबा?
भंडारा विधानसभा क्षेत्र 2009 पासून अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. 2009 मध्ये शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर येथुन निवडून आले होते. साकोलीमधून काँग्रेसचे नाना पटोले हे निवडून आले. तुमसर विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे अनिल बावनकर यांनी बाजी मारली. मात्र, 2014 मध्ये हे चित्र पालटले आणि तुमसर विधानसभा क्षेत्रातून भाजपाच्या चरण वाघमारे यांनी बाजी मारली. भंडारा विधानसभा क्षेत्रातून भाजपचे रामचंद्र हे निवडून आले होते तर, साखळी विधानसभा क्षेत्रातून भाजपाचे बाळा काशीवार हे निवडून आले होते.

भाजपच्या तिकीटावर निवडूण येत नाना पटोले 2014 मध्ये खासदार झाले होते. त्यांनी 3 वर्षांनंतर भाजपला रामराम ठोकत खासदारकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नुकतेच 2019 मध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरींविरुद्ध काॅंग्रेसच्या तिकीटावर नागपूरमधून लोकसभा लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. साकोलीमधून ते विधानसभा लढवतील अशी चर्चा आहे. खुद्द नाना पटोले यांनीही पक्षाने जबाबदारी दिल्यास लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील चित्र बदलण्याची शक्यता आहे.

भाजपच्या विद्यमान आमदारांपैकी काही आमदारांची तिकीट कापली जाण्याची शक्यता आहे. मात्र, सर्व निकाल युती आणि आघाडीच्या निर्णयावर अवलंबून आहेत, असे मत ज्येष्ठ पत्रकार विजय निचकवडे यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details