भंडारा- तिसऱ्या लॉकडाऊनच्या काळात अर्थव्यवस्था सुरू करावी म्हणून भंडारा जिल्ह्यातील व्यवसाय तीन दिवस सुरू करण्यात आले होते. मात्र, आता शनिवारपासून तुमसर तालुक्यातील सर्वच दुकाने शुक्रवार सोडून सकाळी 10 ते 5 दरम्यान सुरू राहणार आहेत. तसा आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढला असून हा आदेश सध्या तुमसर तालुक्यापुरताच मर्यादित आहे. या आदेशामुळे तालुक्यातील दुकानदार खुश आहेत.
तुमसर तालुक्यातील दुकाने आता 6 दिवस खुली राहणार - भंडारा कोरोना न्यूज
कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनचा प्रभाव मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेवर पडला आहे. त्यामुळे या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तिसऱ्या लॉकडाऊच्या काळात नियमांचे पालन करीत व्यवसाय सुरू करण्यात आले. मात्र, अर्धे व्यवसाय आठवड्यातून तीन दिवस आणि अर्धे व्यवसाय आठवड्यातून तीन दिवस सकाळी 11 ते 5 सुरू केले गेले.
कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनचा प्रभाव मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेवर पडला आहे. त्यामुळे या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तिसऱ्या लॉकडाऊच्या काळात नियमांचे पालन करीत व्यवसाय सुरू करण्यात आले. मात्र, अर्धे व्यवसाय आठवड्यातून तीन दिवस आणि अर्धे व्यवसाय आठवड्यातून तीन दिवस सकाळी 11 ते 5 सुरू केले गेले. पण यामुळे व्यावसायिकांना मोठी अडचण निर्माण होत होती. कारण ठराविक वेळेत त्यांचा व्यवसाय होत नव्हता. मात्र, त्यांच्याकडे कामाला असलेल्या कामगारांना महिन्याचा पगार द्यावा लागला असता. त्यामुळे तुमसर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन व्यापार दररोज सुरू ठेवावे अशी विनंती केली.
मुख्याधिकारी यांनी याची कल्पना जिल्हाधिकारी यांना दिली. जिल्ह्या सध्या कोरोनामुक्त आहे आणि कोरोनामुक्त झालेला रुग्ण हा भंडारा तालुक्यातील होता. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या निवेदनाचा सकारात्मक विचार करीत फक्त तुमसर तालुक्यातील सर्व दुकाने सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत 6 दिवस सुरू ठेवण्याची परवानगी दिली. तर शुक्रवारी जीवनावश्यक वस्तूंचे सोडले तर इतर सर्वच दुकाने बंद राहणार आहेत. या आदेशनंतर तुमसर येथील व्यापाऱ्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली आहे. काही प्रमाणात का होईना या व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती उचविली जाईल मात्र व्यापार करीत असताना सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियम काटेकोरपणे पाडावे लागेल तरच कोरोनाचा प्रादुर्भाव थांबेल आणि व्यवसाय निरंतर सुरू राहू शकतील.