भंडारा -विधानसभा अध्यक्ष कोण होईल? याचा निर्णय तिन्ही पक्षाच्या बैठकीनंतर ठरेल, असे माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित येऊन त्याविषयी निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. यावरून विधानसभा अध्यक्षपद हे सहजासहजी राष्ट्रवादीही सोडायला तयार नाही, असे म्हणता येईल.
केवळ काँग्रेस मुख्य दावेदार नाही -
महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष पद हे काँग्रेसला देण्यात आले होते. नुकतेच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेची नजर आहे. तर दुसरीकडे हे पद आमचे होते आणि आमच्याच काँग्रेस पक्षातील व्यक्ती हा विधानसभा अध्यक्ष बनेल, असा कॉंग्रेसचे म्हणणे आहे. मात्र, असे असले तरी याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता विधानसभा अध्यक्षपदाबाबत सध्या तरी कोणताही ठराव झालेला नाही. तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित येऊन त्याविषयी निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. यावरून, विधानसभा अध्यक्षपद हे सहजासहजी राष्ट्रवादीही सोडायला तयार नाही, असे म्हणता येईल. या विधानानंतर काँग्रेसला हे पद राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल असेच दिसत आहे.