भंडारा - जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात आग लागून शुक्रवारी मध्यरारात्री एक हृदयद्रावक घटना घडली. यामध्ये 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. मात्र, या दुर्घटनेत एक दिलासादायक घटना घडली ती म्हणजे सात बालकांना वाचविण्यात येथील सुरक्षा रक्षकांस यश आले. आगीच्या घटना घडली त्यावेळी प्रसंगावधान राखत धाडसाने या बालकांना वाचवणाऱ्या सुरक्षारक्षकांसोबत ईटीव्ही भारतने केलेली खास बातचीत.
भंडारा रुग्णालयातील थरार; स्वतःचा जीव धोक्यात घालून 'त्यांनी' वाचवले सात जीव - दहा बालकांचा मृत्यू
गौरव रेहपाळे, जितेंद्र टाले आणि शिवम मडावी यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. दार उघडताच तिथून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत होता आत मध्ये संपूर्णपणे अंधार होता आणि या धुरामुळे आत जाणे अशक्य होते. आत गेल्यास त्यांचाही जिवास धोका होऊ शकत होता, मात्र मुलांना वाचविणे त्यांचे कर्तव्य आहे, याची त्यांना जाण होती. त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही.

स्वतःचा जीव धोक्यात घालून 'त्यांनी' वाचवले सात जीव
स्वतःचा जीव धोक्यात घालून 'त्यांनी' वाचवले सात जीव
भंडारा रुग्णालयातील या दुर्दैवी घटनेत 10 बालकांपैकी 3 जणांचा होरपळून तर 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देऊन दोषीवर कारवाई करण्याच्या सुचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत. तसेर राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर या घटनेनंतर राज्यातील सर्व रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Last Updated : Jan 11, 2021, 7:54 AM IST