महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Schools Reopen in Bhandara : भंडारा जिल्ह्यातील शाळा विद्यार्थ्यांसाठी ठरल्या 'पर्यटनस्थळ'!

कोरोनाचा (Corona Spread) वाढता प्रादुर्भाव बघता राज्य शासनाने जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाळा बंद (School Closed) केल्या. त्यानंतर गुरुवारी 20 जानेवारीला शालेय शिक्षण मंत्री यांनी 24 जानेवारीपासून पुन्हा शाळा सुरू (Schools Reopen) होतील असा आदेश काढला. मात्र, भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कोणताही आदेश न काढल्याने याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना झाला.

schools closed
शाळेतील विद्यार्थी

By

Published : Jan 24, 2022, 7:30 PM IST

Updated : Jan 24, 2022, 7:51 PM IST

भंडारा - शासनाच्या नियमाप्रमाणे 24 जानेवारी सोमवारला भंडारा जिल्ह्यातील शाळा (Schools Reopen in Bhandara) तर भरल्या, मात्र विद्यार्थ्यांना शिक्षणच मिळाले नाही. कारण शाळा सुरू की बंद ठेवायच्या (Schools Open or Closed) असा कुठलाही आदेश जिल्हाधिकारी (Bhandara Collector) किंवा शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत शाळांना मिळाला नसल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आल्यापावली शाळेतून घरी पाठवले. शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने या विषयी निर्णय घेऊ शकलो नसल्याने तो आज निर्णय घेऊ, असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले. मात्र, कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. शासनाच्या या ढिसाळ नियोजनाचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

माहिती देताना मुख्याध्यापक आणि शिक्षक
  • बातम्या पाहून विद्यार्थी आलेत -

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य शासनाने जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाळा बंद केल्या. त्यानंतर गुरुवारी 20 जानेवारीला शालेय शिक्षण मंत्री यांनी 24 जानेवारीपासून पुन्हा शाळा सुरू होतील असा आदेश काढला. शुक्रवारी तशा बातम्या आल्या. या बातम्या पेपरमध्ये आणि टीव्हीवर पाहून सोमवारी 24 जानेवारी रोजी पालकांची संमती पत्र घेऊन विद्यार्थी शाळेत हजर झाले.

  • सर्व शासकीय आणि अनुदानित शाळेत निर्माण झाला गोंधळ -

जिल्ह्यात 1166 शासकीय आणि खासगी अनुदानित शाळा आहेत. या शाळांना जिल्हाधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांचा कुठलाही निर्णय मिळाला नसल्याने सोमवारी जिल्ह्यातील या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या. मात्र विद्यार्थ्यांना शाळेतर्फे कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याने बातम्यांमुळे विद्यार्थी शाळेत पोहचले. शिक्षकांनी या विद्यार्थ्यांकडून संमती पत्र घेऊन आल्यापावली घरी परत पाठविले.

  • विद्यार्थ्यांच्या आनंदावर विर्जन -

शाळा पुन्हा सुरु झाल्या या आनंदात आज सकाळी शाळेत विद्यार्थी पोहोचले खरे मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका या चिमुकल्यांना सोसावा लागला. शाळा सुरु झाल्याच्या ज्या आनंदाने ते घरून शाळेत आले त्याच आनंदावर शाळेत आल्यावर विरजण पडले आणि हिरमुसलेल्या चेहऱ्याने सर्व विद्यार्थी घरी परतले.

  • मागील तीन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी कोणताच निर्णय घेतला नाही -

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 24 जानेवारीपासून राज्यातील पहिली ते बारावी या वर्गातील शाळा सुरू होतील अशी घोषणा केली तसा आदेश काढला. मात्र, प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी शाळा सुरू करण्याचा किंवा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा असे आदेशात नमूद होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी भंडारा जिल्ह्याची शाळा बंद किंवा चालू ठेवाव्यात असा आदेश काढणे अपेक्षित होतं. मात्र त्यांनी यावर कोणताही निर्णय न घेतल्याने सोमवारी संपूर्ण जिल्ह्यातील शाळांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. याविषयी शिक्षणाधिकारी बारस्कर यांना विचारले असता शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने निर्णय घेता आला नाही सोमवारी काय तो निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले. मात्र कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. तर जोपर्यंत शिक्षण विभागाचा आदेश आम्हाला येणार नाही तोपर्यंत जिल्ह्यातील शाळा बंद राहतील. आदेश मिळाल्यानंतर शाळा सुरू करू व तसे विद्यार्थ्यांना सुचित करू, असे शिक्षकांनी सांगितले.

Last Updated : Jan 24, 2022, 7:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details