महाराष्ट्र

maharashtra

चुकीच्या आरक्षण सोडतीमुळे लाखांदूर तालुक्यातील दोन सरपंच पदाला मुखले

By

Published : Feb 17, 2021, 10:38 PM IST

भंडारा जिल्ह्यात सध्या दोन ग्रामपंचायती अशा आहेत, जिथे निवडणुका तर झाल्या मात्र सरपंच निवडता आले नाहीत. त्यामुळे सरपंच पद रिक्त ठेवण्याची नामुष्की भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मूर्जा आणि चिचाळ ह्या दोन ग्रामपंचायतींवर आली. आरक्षित प्रवर्गाचे सदस्यच निवडणूक आले नसल्याने पदावर कोणाला बसवावे? असा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.

भंडारा
भंडारा

भंडारा- आजपर्यंत सरपंचाशिवाय ग्रामपंचायत अशी स्थिती राज्यात कुठेच घडली नव्हती. मात्र, भंडारा जिल्ह्यात सध्या दोन ग्रामपंचायती अशा आहेत, जिथे निवडणुका तर झाल्या मात्र सरपंच निवडता आले नाहीत. त्यामुळे सरपंच पद रिक्त ठेवण्याची नामुष्की भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मूर्जा आणि चिचाळ ह्या दोन ग्रामपंचायतींवर आली. आरक्षित प्रवर्गाचे सदस्यच निवडणूक आले नसल्याने पदावर कोणाला बसवावे? असा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.

भंडारा

लाखांदूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला पार पडल्या. निवडणुकीनंतर 5 फेब्रुवारीला सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. चिचाळ आणि मूर्जा ग्रामपंचायत अनुसूचित जनजाती (एसटी) महिला प्रवर्गासाठी राखीव झाली. मात्र, आता ह्या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जनजाती (एसटी) महिला राखीव सदस्य निवडून न आल्यामुळे सरपंच पद रिक्त ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सदस्यांनी आपसात निर्णय घेत दोन्ही ग्रामपंचायतींवर उपसरपंच पदी नियुक्ती करून घेतल्या आहेत. सरपंच नसल्याने कोणत्याही महत्त्वपूर्ण कागदावर सही मारता येत नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. शाळा सुरू झाल्याने महत्त्वाचे दाखले सरपंचांच्या सहीसाठी पडून आहेत. सरपंच नसेल तर गावचा विकास कसा होईल? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.

अगोदर निवडणूक नंतर आरक्षण झाल्याने हा घोळ झाला

या अगोदर निवडणूक होण्यापूर्वीच सरपंच पदाचे आरक्षण सोडत व्हायची. त्यामुळे ज्या प्रवर्गासाठी सरपंच पद आरक्षित राहायचे. त्यानुसार उमेदवार निवडणुकीत उभे केले जायचे. मात्र, या वर्षी निवडणुकीनंतर आरक्षण जाहीर झाल्याने असा घोळ झाल्याचे बोलले जात आहे. आता ह्या चुकीच्या आरक्षणाबाबत भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसमोर पेच, शासनाला मार्गदर्शन मागितले

आरक्षणामुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी नेमके काय करता येईल? याविषयीचे मार्गदर्शन जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना मागितले असून त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचे पालन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. या दोन्ही गावांमध्ये अनुसूचित जनजातीचे पुरुष निवडून आले आहेत. मात्र, आरक्षणात महिला अनुसूचित जनजातीसाठी पद राखीव असल्याने हे दोन्ही पद अनुसूचित जनजातीच्या पुरुषांना मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. शासनाने घातलेला हा घोळ लवकर दूर करून आमच्या गावाला सरपंच पद मिळवून द्यावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details