भंडारा - 'सरपंच सेवा महासंघ'च्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंचांनी साखळी उपोषण केले आहे. राज्य शासनाने सरपंचांचे अधिकार कमी केल्याच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी सरपंचांनी हे उपोषण केले आहे, यात महिला सरपंचांचाही समावेश होता.
हेही वाचा... भंडाऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी नियमांचे तिनतेरा
राज्य सरकार सरपंचाच्या अधिकारात सतत कपात करीत असून या अधिकार कपातीमुळे सरपंच नामधारी बनत चालेला आहे, असा आरोप करत, स्थानिक स्वराज्य संस्थेला यामुळे तडा जात आहे, असे सरपंचांचे म्हणने आहे. त्यामुळे सरकारने सरपंचांच्या अधिकारात वाढ करत, त्यांचे दाखले देण्याचे अधिकार पूर्ववत करावे. या मुख्य मागणीसह अन्य काही मागण्यांना घेऊन भंडाऱ्यातील विविध गावातील सरपंचांनी उपोषण केले आहे.