शासकीय अधिकार द्या; 3 महिन्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्वरत करून देऊ - संजय कूटे - nana patole
ओबीसीचे राजकीय आरक्षण वाचवायचे असल्यास त्यांनी आम्हाला केवळ शासकीय अधिकार द्यावेत. या खात्याचा आम्हाला अनुभव आहे. त्यामुळे केवळ 3 महिन्यात आम्ही ओबीसीला राजकीय आरक्षण पूर्वरत करून देऊ, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले आहे.
ओबीसीचे राजकीय आरक्षण
भंडारा- शासकीय अधिकार द्या 3 महिन्यात राजकीय आरक्षण पूर्वरत करून देऊ, असे खळबळजनक वक्तव्य भाजपा नेते आणि ओबीसी खात्याचे माजी कॅबिनेट मंत्री संजय कुटे यांनी केले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ते मंगळवारी भंडाऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
Last Updated : Jun 23, 2021, 7:19 AM IST