भंडारा -पवनी नगरपालिकेचे रस्ते, नाले, आणि संरक्षण भिंत चोरीला गेल्याची तक्रार नगरसेवकांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली असून, या समितीमार्फत चौकशी सुरू आहे. तर ज्या अध्यक्षांवर हे आरोप लावले आहेत. मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे उडालेला गोंधळ असून, मुळात मला आर्थिक व्यवहार करण्याचा अधिकारच नसल्याचे अध्यक्ष म्हणाले.
रस्त्यासह संरक्षण भिंतही गेली चोरीला; पवनी नगरसेवकांचा नगराध्यक्षांवर आरोप 17 पैकी तेरा नगरसेवकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या दस्तऐवजानुसार आरोप लावले आहेत. यामध्ये एकच रस्ता दोन वेगळ्या नावाने दाखवत काम पूर्ण झाल्याचे सांगत रक्कम उचलली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच सार्वजनिक वाचनालयाजवळ असलेल्या चांदेवार चौक पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम एकूण किंमत 42 लाख 26 हजार एवढी होती त्याचे काम पूर्ण झाले असून, देयक उचलले आहेत. तसेच बावनकर गोडाऊन ते डॉक्टर लेपसे चौकापर्यंत पूर्ण रुंदीचा रस्ता याची अंदाजे किंमत 47 लाख 90 हजार एवढी आहे. याचेही काम पूर्ण झाले अशी माहिती या पत्रकात आहे. मात्र, प्रत्यक्षात ही दोन्ही काम एकाच रस्त्याचे असून लेपसे चौक आणि चांदेवार चौक हे दोन्ही एकाच ठिकाणी आहेत. तसेच हे दोन्ही काम अजून, पर्यंत पूर्ण झालीच नाही मात्र पैसे उचलले गेले आणि त्यामुळेच रस्ता चोरीला गेल्याचा आरोप नगरसेवक करीत आहेत.
इतर बांधकामाच्या ठिकाणीही अशीच परिस्थिती असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. भिवापूरवाडी ते श्रीराम मंदिर शेतीपर्यंत नाल्यास काँक्रीट संरक्षण भिंतीचे बांधकाम किंमत 2 कोटी 43 लाख एवढे असून, संपूर्ण निधी खर्च झालेला आहे. तसेच धोबीतलाव ते काटेखाये यांच्या शेतीपर्यंत सिमेंट काँक्रीटचा नाला किंमत 80 लाख 36 हजार एवढी असून, काम सुरू असल्याचे दाखविले आहे. मात्र, प्रत्यक्षात भिवापूरवाडी आणि काटेखाये शेती हे दोन्ही एकाच ठिकाण आहे. अध्यक्षांनी त्यांच्या शेतीसाठी चक्क नाल्यावर सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची निर्मिती केली आहे आणि नाल्याचे काम अपूर्ण असतानाही ते पूर्ण झाल्याचे दाखवत दोन कोटी 43 लाखाची उचल केली आहे. असा आरोप नगरसेवकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्राच्या माध्यमातून केलेले आहे. 13 नगरसेवकांनी याची तक्रार जिल्हाधिकारी यांना दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी चौकशी सुरू केली आहे.
मुख्याधिकार्यांना विचारले असता एमबी कोणी बनवली? कोणी देयक उचलले? या विषयीची सर्व माहिती ही चौकशी समितीला दिली आहे. त्यांचा जो अहवाल येईल ते मान्य नाही असे त्यांनी सांगितले तर ज्या पवनीच्या नगराध्यक्ष वर हे आरोप लावले गेले आहेत त्यांच्या मते मुख्याधिकारी यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. प्रत्यक्षात मला कोणतेही आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकारच नाही. त्यामुळे माझ्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचे त्यांनी सांगितले.